Tag: Chikhali

श्री गजानन बाल संस्कार केंद्राची घोरदेश्वर येथील सहल उत्साहात 
पिंपरी चिंचवड

श्री गजानन बाल संस्कार केंद्राची घोरदेश्वर येथील सहल उत्साहात

पिंपरी : लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.. या म्हणीप्रमाणे नेवाळे वस्ती चिखली (Chikhali) येथे श्री गजानन बाल संस्कार केंद्र प्रत्येक रविवारला घेण्यात येते. केंद्राच्या वतीने घोरदेश्वर येथे बालचमूंसची सहल काढण्यात आली होती. सकाळी साडेसहाला नेवाळे वस्ती येथून घोरदेश्वरला निघाले व सात वाजता डोंगर चढण्यास सुरुवात झाली. सहली मध्ये ४ वर्षाच्या बालपासून ते १२ वर्षाचे बालक सहभागी झाले होते. सर्वजण प्रथमच डोंगर चढत होते. त्यामुळे डोंगर चढतांना सर्वांना खूपच मजा आली, वरती पोहचल्या नंतर सर्वांनी व्यायाम केला तसेच खेळ सुद्धा झाले नंतर पद्य म्हटले नंतर सर्वांनी घरून आणलेला नाश्ता केला. या साहिलीमुळे मुलामध्ये गड किल्ले बघण्याची ओढ निर्माण झाली. बालवयात अशा प्रकारचे छंद निर्माण होणे, खूप महत्वाचे. या सहलीचे आयोजन मंगेश पाटील यांनी केले होते. या सहलीमध्ये त्यांना श्रीकृष्ण काशीद, चिरतन क...
रखडलेले रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल | सुनील कुसाळकर यांचा इशारा
पिंपरी चिंचवड

रखडलेले रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल | सुनील कुसाळकर यांचा इशारा

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : प्रभाग क्रमांक दोन बोल्हाईचा मळा जाधववाडी चिखली येथील कॉलनी क्रमांक सात (२) मधील रस्त्याचे काम ठेकेदाराने जाणून बुजून रखडवले आहे. यामध्ये स्थानिक सत्ताधारी व ठेकेदार यांच्या संगनमताने रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट नसल्याने हे घाण पाणी रस्त्याच्या वरून जात आहे. परिणामी आरोग्याची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, तरी ठेकेदाराने रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग सुनील कुसाळकर सोबत अनंत सुपेकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी क...
महावितरणचा कारभार सुधारण्याची चिखली-कुदळवाडीतील नागरिकांची मागणी
पिंपरी चिंचवड

महावितरणचा कारभार सुधारण्याची चिखली-कुदळवाडीतील नागरिकांची मागणी

पिंपरी चिंचवड : महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे चिखली-कुदळवाडीतील नागरिक वैतागले आहेत. या परिसरातील संपूर्ण वीज पुरवठा यंत्रणा दोषमुक्त आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महावितरणला नव्या कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे. चिखली प्राधिकरण, राजे शिवाजीनगर (पेठ क्र. १६) जाधववाडी, पंतनगर, कुदळवादी परिसरात तर मंगळवारी (दि.१९) रात्री दहा वाजता बत्तीगुल झाल्यामुळे हजारो नागरिक घामाघूम झाले होते. अनेक सोसायट्यामधील पाणी उपसा सलग पाच तास वीज पुरवठा नसल्यामुळे बंद पडला होता. असे नागरिकांनी सांगितले. औद्योगिक वापरासाठी असलेल्या उच्चदाब वाहिनीवरून येथील घरगुती ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. मोशी येथील महावितरण कार्यालयाचा देखभाल आणि तांत्रिक विभागाचे येथील कामकाजामध्ये बिले वसूल करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम नाही. असाही आरोप नागरिकांनी केला आहे.&...
चिखलीत आढळला विषारी साप | सर्पमित्राने सुखरूप सोडले निसर्गाच्या सान्निध्यात (Video)
पुणे

चिखलीत आढळला विषारी साप | सर्पमित्राने सुखरूप सोडले निसर्गाच्या सान्निध्यात (Video)

https://youtu.be/UWWVcJ6bBBI पिंपरी : सर्पमिञ वैभव कुरुंद यांना चिखलीतील नेवाळेवस्ती परिसरातून संतोष यांनी साप आढळल्याची माहिती दिली. करूंद यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, तो मन्यार जातीचा विषारी साप असल्याचे त्यांना समजले. मोठ्या शिताफीने या सापाला पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. करूंद यांनी पकडलेला साप तीन फुट लांबीचा होता. सापाचा रंग निळसर काळा आणि त्यावर सुमारे ४० पातळ पांढरे आडवेपट्टे होते. मन्यार साप हा भारतीय उपखंडातील अत्यंत विषारी सापांपैकी एक असून हा सरासरी ८ ते १२ अंडी घालतो. असे करूंद यांनी सांगितले. ...