कर्जत तालुक्यात नवीन जिल्हा परिषद गटाची निर्मिती होणार : पप्पू शेठ धोदाड यांच्या मागणीला यश

कर्जत तालुक्यात नवीन जिल्हा परिषद गटाची निर्मिती होणार : पप्पू शेठ धोदाड यांच्या मागणीला यश

कर्जत : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2021-22 साठी कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक नवीन गट आणि पंचायत समितीच्या दोन गणाची वाढ करण्यात यावी अशी मागणी कुंभेफळ ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच पप्पू शेठ धोदाड यांनी काही दिवसांपुर्वी केली होती. त्यानुसार तालुक्यातील वाढीव मतदार संख्या लक्षात घेऊन होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूकी साठी प्रशासनाने नवीन जिल्हा परिषद गट स्थापन करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू केल्या असून नवीन जिल्हा परिषदेच्या एका गटाची तर पंचायत समितीच्या दोन गटाची निर्मिती होणार असल्याचे समोर येत आहे.

कर्जत ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्याने तालुक्यातील जिल्हापरिषदेचा एक गट कमी झाला होता. वाढीव लोकसंख्या विचारात घेऊन जिल्हा परिषदेच्या चार गटा ऐवजी पाच गट व्हावेत या धोदाड यांच्या मागणीनुसार कर्जत तालुक्यात कोरेगाव जिल्हा परिषदेच्या नवीन गटाची निर्मिती होणार असल्याचे समजते तर पंचायत समितीच्या कोरेगाव व शिंदा या दोन गणाची निर्मिती होणार असल्याचे समोर येते आहे. वाढीव मतदारसंख्या व अधिकच्या गावां मुळे जिल्हा परिषद सदस्यांना जनसामान्यांना विकासाच्या दृष्टीने न्याय देणे कठीण होत होते. मात्र आता मर्यादित गावांच्या समाविष्ट गट स्थापनेमुळे सदस्यांना विकास योजना राबविण्यात अडचणी येणार नाहीत असे दिसून येते. त्याच बरोबर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राजकारणामध्ये चांगले काम करणाऱ्या युवकवर्गालाप्रतिनिधित्वाची संधी देखील मिळणार आहे.

“आता जिल्हा परिषदेच्या नवीन गट निर्मिती ने ग्रामीण भागातील जनतेला मुलभूत गरजा व विकासात्मक गोष्टींना योग्य पद्धतीने प्राधान्य देता येईल. तसेच एका जिल्हा परिषद सदस्या मागे दोन पंचायत समितीचे सदस्य वाढीने ग्रामीण भागातील दुर्लक्षित जनतेला न्याय देण्यास हातभार लावण्यास मदत होणार आहे. व ग्रामीण भागातून नवीन नेतृत्व तयार होण्यास नवयुवकाना संधी मिळणार आहे.”. _पप्पू धोदाड