चिंचवडमध्ये स्टार्स एलेवेन क्रिकेट आकादमीचे उद्घाटन

चिंचवडमध्ये स्टार्स एलेवेन क्रिकेट आकादमीचे उद्घाटन

चिंचवड : प्रभाग क्र. 18 मधील मोरया गोसावी स्टेडियम या ठिकाणी ‘स्टार्स एलेवेन’ या क्रिकेटआकादमीचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, राजेंद्र तानाजी गावडे, मोरेश्वर भोंडवे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अपर्णा डोके, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, क्रिडा अधिकारी राजेंद्र कोतवाल, महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड सदस्य सुनिल मुथा, शिवाजी उदय मंडळ अध्यक्ष सदाशिव गोडसे, माजी अध्यक्ष राजाराम गावडे, क्रिकेट अकादमीचे संचालक अमित भोंडवे, प्रमोद टोणपेकर, तसेच प्रभागातील क्रिकेट प्रेमी, नागरिक उपस्थित होते.

प्रशिक्षणासाठी ईच्छुक खेळाडूंनी ९८२२४७७१११, ९८२२५१०४४० या नंबरवर संपर्क साधावा. असे आवाहन अमित भोंडवे यांनी केले आहे.