ज्योत्स्ना राणे
आजकाल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या पाहायला मिळतात उदा. जागतिक तापमान्य वाढ, लोकसंख्या वाढ, कमी पर्जन्यमान, या मध्ये प्रदुषण ही खुुप मोठी समस्या आहे. प्रदुषण म्हणजे तर नैसर्गिक संतुलनामध्ये दोष येणे, निसर्ग असंतुलित होणे. या द्वारे अनेक आजार निर्माण होतात.
प्रदुषणाचे प्रकार :१) जलप्रदुषण २) वायु प्रदुषण ३) ध्वनी प्रदुषण ४) भुमी प्रदुषण
प्रदुषणाची कारणे : १) जलप्रदुषण – म्हणजेच पाणी दुषित होणे कारखान्यातुन व छोट्या मोठ्या कंपन्या मधुन जे दुषित पाणी नदया तलावानमध्ये सोडले जाते. २) वायुप्रदुषण – वायुप्रदुषन म्हणजेच हवा दुषित होणे वाहत जाणारा वाहनाची संख्या व वाहणामध्ये असलेला कॉर्बनडॉय ऑक्साईड वातावरणामध्ये मिसळ जातो त्यामुळे वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कॉर्बनडॉय ऑक्साईडचे प्रमाण वाढते त्यामुळे आपल्याला श्वसनाचे व ह्हदयाचे आजार होण्याची शक्यता असते ३)ध्वनी प्रदुषन -हे मोठ्मोठ्या शहरांमध्ये व महानगरांमध्ये जास्त पाहायला मिळते यामुळे कानाच्या समस्या उ्दभवतात ४) भुमी प्रदुषण – जमिन दुषित होणे म्हणजेच भुमी प्रदुषण वेगवेगळ्या प्रकारचे किटकनाशके जमिनीवर वापरल्यास जमिन नापिक होते.
प्रदुषणावर नियंञण ठेवण्यास उपाय : १) कारखान्यातील व कंपनीतील अथवा घरातील सांडपाणी बंद गटारीने सोडावे २) वायुप्रदुषण होऊ नये म्हणुन जास्तीत जास्त झाडे लावावी त्यामुळे आपल्याला भरपुर ऑक्सिजन मिळेल ३) ध्वनीप्रदुषण – वाहणे चालवितांना नको त्या ठिकाणी हॉन वाजवु नये, कार्य समारंभात फटाके फोडणे टाळावे ,लग्नात होणारे डिजेचे आवाज हे सर्व थांबवावे ४) भुमीप्रदुषण – घातक किटकनाशके वापरणे थांबवावी, झाडे जगवावी.
प्रदुषण हे रोखले जाऊ शकते. यासाठी लोकांन मध्ये जनजागृती करायला हवी वृक्ष तोड थांबवावी लागेल आणि वृक्ष लागवडीला प्रोत्साहन दयावे लागेल. जर आपण हुशारीने काम केले, तर आम्ही लोकसंख्येचा दर कमी करु शकतो. उपकरणाच्या वापरांवर नियंञण ठेऊ शकतो. त्यामुळ आपण बरायच पैकी नियंत्रण ठेऊ शकतो.