करीना कपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा | ख्रिश्चन एकता मंचाचे ठाम मत

करीना कपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा | ख्रिश्चन एकता मंचाचे ठाम मत

मुंबई : करीना कपुर यांनी त्यांच्या पुस्तकाच्या शीर्षकात ‘बायबल’ या शब्दाचा वापर केल्याप्रकरणी ख्रिस्ती समाजातुन त्यांचा निषेध केला जात आहे. याप्रकरणी ‘ख्रिश्चन एकता मंच’च्या वतीने महाराष्ट्रातील अनेक भागातून जोरदार निषेध व्यक्त होत असून त्याला समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच मंचाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जागोजागी संबंधित कार्यालयांमध्ये लेखी स्वरूपात निषेध नोंदवत आहेत. दरम्यान, करीना कपुर यांच्यावर गुन्हा नोंदवावा, अशी तीव्र मागणी सुध्दा करण्यात येत आहे.

ख्रिश्चन एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रभुदास दुप्ते यांनी मीडियाला माहिती दिली की, याप्रकरणी मंचाच्या वतीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निषेध नोंदवण्यात आलेला आहे. तसेच करीना कपुर यांचे मुंबई येथील निवासा नजीकच्या वरळी पोलिस स्टेशनमध्ये सुध्दा आम्ही तक्रार नोंदविण्यास गेलो, असता पोलिसांनी पुराव्यांची मागणी केली. अद्याप पुरव्याभावी वरळी पोलिसांनी तक्रार घेतलेली नाही. त्यासाठी आम्ही सीडी, फोटो इत्यादीच्या माध्यमातुन पुरावे सादर करणार आहोत.

दुप्ते पुढे म्हणाले की, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून न घेतल्यास, करीना कपूरच्या निवासासमोर आंदोलन करू, असा ख्रिश्चन एकता मंचाने दिलेला इशाऱ्याची माहिती करीना कपुर यांचे पर्यंत पोहोचली आहे, असा आम्हाला अंदाज आहे.

दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसात राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी निवेदन देणार आहोत. निवेदन दिल्यानंतर तक्रार दाखल न झाल्यास, २७ जुलैला करीना कपूर यांच्या घराबाहेर तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेऊ. असेही यावेळी सांगणार आहोत, असे दुप्ते यांनी सांगितले.

दरम्यान सबंध महाराष्ट्रातून ख्रिश्चन एकता मंचच्या कार्यकर्त्यांची ह्या आंदोलनाकरिता उत्स्फूरतपणे तयारी सुरु आहे, असे चित्र सध्या ख्रिस्ती समाजात दिसत आहे. असे सामाजिक कार्यकर्ते व ख्रिच्छन एकता मंच संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पठारे यांनी सांगितले.