कोमल शिंदे यांचा हिरकणी पुरस्काराने होणार सन्मान

कोमल शिंदे यांचा हिरकणी पुरस्काराने होणार सन्मान

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश मंत्री (चिटणीस) कोमल रमेश शिंदे यांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त तुळजापूर येथे साप्ताहिक न्यूज हिरकणीच्या माध्यमातून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

प्रभाग क्रमांक १९ मधील आनंद नगर येथे स्थायिक असलेल्या उच्चशिक्षित कोमल शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या कार्याची महाराष्ट्र भर दखल घेतली जात असून त्या जणसामान्यांचे व मागासवर्गीय महिलांचे नेतृत्व म्हणून प्रचलित होत आहेत.

दरम्यान, तुळजापूर येथील आरळी बुद्रुक येथे महिला दिनाचे औचित्य साधून ७ मार्चला या पुरस्काराचा वितरण समारंभ पार पडणार आहे. शिंदे यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.