
पिंपळे सौदागर : प्रत्येकजण नियमितपणे स्वच्छ कपड्यांना प्राधान्य देत असतो. शहरी भागांमध्ये लॉण्ड्री (Laundry) ही नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची सेवा आहे. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळत असतो. त्यामुळे अधिकाधिक उद्योजक कपडे धुण्याच्या लॉण्ड्री (Laundry) या व्यवसायाकडे वळत आहेत. त्यात नियमितपणे गुणवत्ता दिल्यास ग्राहक समाधानी राहतो. सफाई व्यवसायात याच सेवेला अधिक महत्व असते. त्यामुळेच ग्राहक स्वतःहून अशा लॉण्ड्री (Laundry) चालकांना नेहमीच प्राधान्य देत आला आहे, असे मत उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी व्यक्त केले.
पिंपळे सौदागर येथील जरवरी सोसायटीत ''यु क्लीन'' या अत्याधुनिक लॉण्ड्री (Laundry) आणि ड्राय क्लिनिंग (Dry Cleaning) सेवेचे उद्घाटन कुंदाताई भिसे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, लॉण्ड्रीचालक शुभम डालमिया, सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
लॉण्ड्री चालक शुभम डालमिया माहिती देताना म्हणाले, भारतातील अग्रणी 'यु क्लीन'' या आधुनिक पद्धतीच्या लॉण्ड्री (Laundry) आणि ड्राय क्लिनिंग (Dry Cleaning) सेवेचा पिंपळे सौदागरमधील ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. व अत्याधुनिक प्रथमच पिंपळे सौदागर मध्ये या प्रकारची मशिन्स उपलब्ध करण्यात आल्या आहे. महिलांच्या साड्या, पुरुषांचे कोट यांचे ड्रायक्लीनिंगचे तसेच इस्त्री, बूट, पडदे अनं बॅग क्लिनिंगची देखील सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. अगदी माफक दरात अनं शिवाय होम डिलिव्हरी देखील फ्री आहे. या प्रक्रियेत प्रशिक्षित कामगार वर्ग अनं पर्यावरण पूरक साधनांचा वापर होणार आहे. कॉर्पोरेट क्षेत्रापासून ते विविध कार्यालय, घरगुती ग्राहकांनी या इको फ्रेंडली लॉण्ड्री (Laundry) आणि ड्राय क्लिनिंग (Dry Cleaning) दालनास भेट द्यावी.