पिंपरी चिंचवडमधून महाराष्ट्र राज्य औषध परिषदेच्या निवडणूकीत एमएससीडीए पॅनलला मताधिक्य देणार

पिंपरी चिंचवडमधून महाराष्ट्र राज्य औषध परिषदेच्या निवडणूकीत एमएससीडीए पॅनलला मताधिक्य देणार
  • केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांचा निर्धार

पिंपरी, ता. 23 : पिंपरी चिंचवडमधून महाराष्ट्र राज्य औषध परिषदेच्या निवडणूकीत महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोसिएशनच्या (MSCDA) पॅनलला मताधिक्य देणार आहे. असा ठाम विश्वास केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर येथे व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदच्या निवडणुकीचा अंतीम टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. माजी आमदार अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष जग्गनाथ ऊर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड तर्फे सभा आयोजित केली होती. त्यावेळी विवेक तापकीर बोलत होते.

या सभेला माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे, विजय पांडुरंग पाटील, एमएससीडीए पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष बच्चूभाई ओसवाल, पश्चिम क्षेत्राचे सहसचिव दत्तप्रसाद टोपे, सीएपीडीचे सचिव अनिल बेलकर, सीएपीडीचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष खिंवसरा, सीएपीडीचे संघटक सचिव रविंद्र पवार, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर व अनेक मान्यवरांसह केमिस्ट मोठ्या संख्येने केमिस्ट उपस्थित होते.

पिंपरी चिंचवडमधून महाराष्ट्र राज्य औषध परिषदेच्या निवडणूकीत एमएससीडीए पॅनलला मताधिक्य देणार

दरम्यान, विवेक तापकीर हे प्रचारात मुसंडी मारली असून असोसिएशनने केलेली कामे व पुढचे फार्मासिस्टच्या हितासाठी ठेवलेले व्हिजन हे मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी तापकीर हे सर्व फार्मासिस्टपर्यंत पोहचत आहेत. या निवडणूकीत राज्यात २,८०,५०३ मतदार असून महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोसिएशन (एमएससीडीए) पॅनलचे अतुल अहिरे, गणेश चंद्रकांत बंगळे, नितीन नवनीतराय मणियार , मनोहर सोपान कोरे, विजय पांडुरंग पाटील, सोनाली देविदास पडोळे हे उमेदवार रिंगणात आहेत.

यावेळी आप्पासाहेब शिंदे यांनी आपली संकल्पना मांडलताना सांगितले की, बजेट तुमचे औषध आमचे या संकल्पनेनुसार नागरिकांसाठी त्यांच्या सोईनुसार औषधे उपलब्ध करून देण्याच्या मानस ठेवला आहे.

तसेच महाराष्ट्र राज्य औषध परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी परिषदेसाठी केलेले काम व भविष्यात करण्यात येणारी कामे विशद केली व फार्मासिस्ट विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे त्यांनी सांगितले.

या सभेचे सूत्रसंचलन विवेक तापकीर यांनी केले, तर रवि पवार यांनी आभार मानले.