लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड कन्जर्व्हेशन ट्रस्टने दिले घुबडाला जीवनदान

लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड कन्जर्व्हेशन ट्रस्टने दिले घुबडाला जीवनदान

पिंपरी : धानोरे येथे अडकलेल्या गव्हाणी घुबडाला लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड कन्जर्व्हेशन ट्रस्टच्या सदस्यांनी पकडून सुखरूपपणे आज निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. त्यामुळे या घुबडाला जीवनदान मिळाले.

धानोरे येथील नवनाथ गायकवाड यांनी लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड कन्जर्व्हेशन ट्रस्टशी संपर्क साधून घुबड अडकले असल्याची माहिती दिली.

त्यानंतर ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष विक्रम भोसले व सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, हे घुबड गेले चार ते पाच दिवस गायकवाड यांच्या घरातच असल्याचे त्यांना कळले. या घुबडाला सुरक्षितपणे पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.

दरम्यान, काही नागरिकांनी गायकवाड कुटूंबियांना अंधश्रद्धेपोटी घुबडाविषयी गैरसमज पसरून भीती दाखवण्याच्या प्रयत्न केला. मात्र, गायकवाड कुटूंबीयांनी त्याला बळी न पडता त्या पक्ष्याचे संरक्षण केले. त्याबद्दल अध्यक्ष विक्रम भोसले यांनी त्यांचे आभार मानले. तसेच त्यावेळी भोसले यांनी नागरिकांना घुबडाविषयी माहिती देऊन जनजागृती केली.