काळेवाडी, ता. १४ : येथील ज्येष्ठ नागरिक महादेव लखु मिरगल (रा. ओमकार कॉलनी, विजयनगर) यांचे आज सकाळी साडेसहाच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. काळेवाडीतील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिवंगत महादेव मिरगल हे थरमॅक्स कंपनीचे माजी कामगार असून त्यांचे मुळगाव कोकणातील कुर्ला दिवेकरवाडी (ता. महाड, जि. रायगड) आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचे थोरले पुत्र अनिल मिरगल रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक तर सुनिल मिरगल यांचा व्यवसाय आहे. तसेच धाकटे पुत्र सुशील मिरगल हे थरमॅक्स कंपनीत नोकरीला असून ते थरमॅक्स कामगार संघटनेचे उपाध्यक्षही आहेत. त्यांची मुलगी जयश्री शत्रुघ्न तटकरे (रा. खेड, जि. रत्नागिरी) या उद्योजक असून पुण्यातच स्थायिक आहेत. दरम्यान, काळेवाडी येथे २३ जानेवारी रोजी दशक्रिया विधी होणार आहे.