अभिमान स्कूलमध्ये मकरसंक्रांत ऑनलाईन साजरा

निगडी : प्राधिकरण मधील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अभिमान इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलमध्ये मकरसंक्रांत हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने इयत्ता पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पतंगाच्या आकाराचे सुंदर भेटकार्ड बनवले. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी तिळगुळाचे दागिने (हलव्याचे दागिने) बनविले. इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर ‌पतंग तयार करून त्यावर सामाजिक संदेश लिहीला.

सर्व विद्यार्थ्यांना मकरसंक्रांत का‌? व केव्हा? साजरी केला जाते, या विषयाची माहिती शिक्षकांनी दिली. या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांनी मार्गदर्शन केले.