डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अविनाश सांगोलेकर, डॉ. अंबादास सगट यांना मातंग साहित्य परिषदेचा पुरस्कार | उद्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते वितरण

लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी चिंचवड : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त उद्या मातंग साहित्य परिषदेच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

काळेवाडीतील राजवाडा लॉन्स येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील असतील. अशी माहिती मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. धनंजय भिसे यांनी दिली.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अविनाश सांगोलेकर, यांना समाजमित्र व डॉ. अंबादास सगट यांना समाजरत्न पुरस्काराने, तर डॉ. बाबासाहेब शेंडगे व डॉ. राजाभाऊ भैलुमे यांना समाजबंधु पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच डॉ. प्रिया गोरखे व जालिंदर कांबळे यांना ही विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.

डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अविनाश सांगोलेकर, डॉ. अंबादास सगट यांना मातंग साहित्य परिषदेचा पुरस्कार | उद्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते वितरण