अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न म्हणयाला आवडेल | केंद्रिय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांचे प्रतिपादन
पिंपरी : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हे कविसंमेलन घेतले आहे. ते अण्णा भाऊ स्वत: कवी होते. शाहिर होते, ज्यांच्या साहित्यातील लेखनाची दखल तात्कालिन काळात घेतली गेली नाही, जे आजच्याही काळात वास्तवतेचा अनुभव देते. त्यामुळे अण्णा भाऊंना भारतरत्न म्हणायला आवडेल. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक होते तर वंचितांच्या असंतोषाचे जनक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे होते असे प्रतिपादन केंद्रिय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी केले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती प्रित्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड, मातंग साहित्य परिषद व निवारा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 'अखिल भारतीय मराठी कविसंमेलनाचे' ऑनलाईन माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
...