मनसे नेत्या अनिता पांचाळ यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून फोडला प्रचाराचा नारळ

मनसे नेत्या अनिता पांचाळ यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून फोडला प्रचाराचा नारळ

काळेवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला उपशहराध्यक्षा अनिता पांचाळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ३१ मधून इच्छुक असून त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रचाराचा नारळ फोडला आहे.

मनसे प्रदेश उपाध्यक्ष गणेश सातपुते व रंजित दादा, शहराध्यक्ष व गटनेते सचिन चिखले, शहराचे सचिव व महापालिका कर्मचारी सेनेचे शहराध्यक्ष रुपेश पटेकर, महिला शहराध्यक्ष अश्विनी बांगर, वाहतुक सेनेचे शहराध्यक्ष सुशांत साळवी, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, जनहित कक्षाचे शहराध्यक्ष राजू भालेराव, विधि विभागाच्या शहराध्यक्षा प्रिति परदेशी, माथाडी सेनेचे शहराध्यक्ष शिंगाडे भाऊ, विनोद भंडारी, अनिकेत प्रभु, राजु सावळे, बाळ दनावले, विशाल मानकरी, शैलेश पाटिल, महिला शहर सचिव सीमा बेलापुरकर, उपशहराध्यक्ष संगीता देशमुख, स्नेहल बांगर, विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे, अंकुश तापकीर, दत्ता देवतरसे, सुरेश सकट, निलेश नेटके, विद्या कुलकर्णी, काटे मामी, अदिती चावरिया, विशाल साळुंके, आकाश लांडगे, अनिता नाईक, वैशाली बोत्रे, वैशाली कोराटे व सर्व उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, गटअध्यक्ष व तसेच सर्व महाराष्ट्र सैनिक व इतर पक्ष्याचे आजी माजी नेते मंडळींनी अनिता पांचाळ यांच्या वाढदिवस कार्यक्रमाला हजेरी लावून त्यांना शुभेच्छा दिल्या.

अनिता पांचाळ म्हणाल्या की, नागरिकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद, आशीर्वाद आणि प्रेम पाहून आगामी महापालिका निवडणुकीत काळेवाडीत मनसेचा झेंडा फडकणारच. आता नागरिकांच्या हक्कांसाठी निरंतर लढा द्यायचा असून काळेवाडीच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प केला आहे. तसेच सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो.