संविधान किती ही चांगले असले, तरी राज्यकर्ते त्याचा गैरवापर करतात – अॅड. सतीश कांबीये

संविधान किती ही चांगले असले, तरी राज्यकर्ते त्याचा गैरवापर करतात - अॅड. सतीश कांबीये

चिंचवडगाव : संविधान किती ही चांगलं असले, तरी राज्यकर्ते त्याचा वापर नीट करीत नाहीत. त्यांच्या मदतीला पत्रकारिता व न्याय व्यवस्था असल्याने संविधानाचा गैरवापर केला जातो. मात्र, संविधानाबाबत जनजागृती केल्यास संविधानाचा गैरवापर टाळता येऊ शकतो. असे प्रतिपादन संविधान अभ्यासक अॅड. सतीश कांबीये यांनी येथे केले.

येथील प्रबुद्ध संघाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून संविधान अभ्यासक अॅड. सतीश कांबीये होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात अणुराधा सोनवणे यांनी संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर सोनवणे हे होते.

संविधान किती ही चांगले असले, तरी राज्यकर्ते त्याचा गैरवापर करतात - अॅड. सतीश कांबीये

त्याप्रसंगी नगरसेवका अश्विनी चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, अपर्णा डोके, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पवार, डांगे पाटील यांच्यासह प्रबुद्ध संघाचे सभासद व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक पवार, राजू वासनिक, प्रतिमा साळवी, दिलीप गोडबोले, सुधीर कडलग यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावना किशन बलखंडे (सचिव प्रबुद्ध संघ) यांनी केली. सुत्रसंचलन अल्पणा गोडबोले यांनी केले तर आभार धर्मेंद्र रामटेके यांनी मानले.