काळेवाडीत रस्त्यांमधील विद्युत डीपी बॉक्सचा वाहतुकीस अडथळा

काळेवाडीत रस्त्यांमधील विद्युत डीपी बॉक्सचा वाहतुकीस अडथळा

लोकमराठी न्यूज नेटवर्क

काळेवाडी : प्रभाग क्रमांक २२ मधील विजय नगर भागात अनेक विद्युत डीपी बॉक्स रस्त्यांमध्ये बसविलेले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अनेकदा अपघातही झाले आहेत. असे रहदारीला त्रासदायक ठरणारे डीपी बॉक्स रस्त्यांच्या बाजूला बसवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुलराहिम यांनी केली आहे.

महावितरणच्या वतीने बसविला जाणारे विद्युत डब्बे रस्त्याच्या कडेला बसविणे अवश्यक होते. परंतु, ते साधारण तीन फूट रस्त्यांमध्ये बसविले आहेत. या ठिकाणी राहणार्‍या करदात्यांना असे नियम बाह्य बसविलेल्या डब्यांमुळे अडचण होत आहे. वाहन चालवताना वळणावर जपून चालवावे लागते, कारण या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता जास्त असते. मागील पाच वर्षात कोणीही या प्रकरणात लक्ष घातले नाही. असे शेख यांनी सांगितले.