Tag: MSEDCL

काळेवाडीत रस्त्यांमधील विद्युत डीपी बॉक्सचा वाहतुकीस अडथळा
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत रस्त्यांमधील विद्युत डीपी बॉक्सचा वाहतुकीस अडथळा

लोकमराठी न्यूज नेटवर्क काळेवाडी : प्रभाग क्रमांक २२ मधील विजय नगर भागात अनेक विद्युत डीपी बॉक्स रस्त्यांमध्ये बसविलेले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अनेकदा अपघातही झाले आहेत. असे रहदारीला त्रासदायक ठरणारे डीपी बॉक्स रस्त्यांच्या बाजूला बसवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुलराहिम यांनी केली आहे. महावितरणच्या वतीने बसविला जाणारे विद्युत डब्बे रस्त्याच्या कडेला बसविणे अवश्यक होते. परंतु, ते साधारण तीन फूट रस्त्यांमध्ये बसविले आहेत. या ठिकाणी राहणार्‍या करदात्यांना असे नियम बाह्य बसविलेल्या डब्यांमुळे अडचण होत आहे. वाहन चालवताना वळणावर जपून चालवावे लागते, कारण या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता जास्त असते. मागील पाच वर्षात कोणीही या प्रकरणात लक्ष घातले नाही. असे शेख यांनी सांगितले. https://www.amazon.in/gp/product/B00F38B3NW/ref=a...
ऑनलाइन वीजबिलासाठी मोबाइल नोंदणी
पुणे

ऑनलाइन वीजबिलासाठी मोबाइल नोंदणी

वीजबिलांची छपाई आणि वितरण बंद; मोबाइल क्रमांकाची नोंदणी पुणे (लोकमराठी) : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात सध्या टाळेबंदी सुरू असल्याने २३ मार्चपासून महावितरणने वीजबिलांची छपाई आणि वितरण बंद केले असले, तरी ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यादृष्टीने ग्राहकाला एसएमएसच्या माध्यमातून वीजबिल मिळण्यासाठी महावितरणकडे मोबाइल क्रमांकाची नोंदणी आवश्यक आहे. पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहर, पिंपरी- चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीणमधील मुळशी, वेल्हे, मावळ, जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांत कृषी, अकृषक वर्गवारीतील २७ लाख ८७ हजार २०४ (९०.४७ टक्के) वीजग्राहकांनी महावितरणकडे ग्राहक क्रमांकासोबत त्यांच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली आहे. टाळेबंदीमध्ये या ग्राहकांना वीजबिलांची माहिती ‘एसएमएस’द्वारे देण्यात येत आहेत. पुणे शहरामधील कोथरूड, शिवाजीनगर, रास्तापेठ, नगररो...