युवा नेते राहुल मदने यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

युवा नेते राहुल मदने यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

पिंपरी : आपण समाजाचे काही देणे लागते, या विचाराचे अनुकरण करत वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मल्हार आर्मीचे जिल्हाध्यक्ष व बहुजन समाज पार्टीचे शहर सचिव राहुल मदने यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. चिंचवडेनगर येथील भोलेश्लर मंदिरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले.

मल्हार आर्मीचे संस्थापक -अध्यक्ष सुरेश कांबळे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, शेखर चिंचवडे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, एकविरा ग्रुपचे अध्यक्ष सुधीर वाल्हेकर, महिद्रा लॉजिस्टिक कामगार युनियचे खजिनदार बिभीषण घोडेके, राजाभाऊ चिंचवडे, श्रीकांत धनगर, शिवाजी आवारे, कमलाकर गोसावी, रावसाहेब वायकुळे, नागनाथ वायकुळे, नरेश सोंडकर, मल्हार आर्मीचे शहराध्यक्ष दिपक भोजने, विनोद बरकडे, ऑल इंडीया धनगर समाज महासंघाचे शहराध्यक्ष महावीर काळे यांच्यासह विविध मान्यवरांनी राहुल मदने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

रक्तदान शिबिरास सचिनदादा चिंचवडे युथ फाउंडेशन, पुण्यश्लोक अहिल्यामाता प्रतिष्ठान चिंचवडेनगर, शेखर आण्णा चिंचवडे युथ फाउंडेशन, जय गुरूदत्त मित्र मंडळ चिंचवडेनगर, भोलेश्लर प्रतिष्ठान, शिव प्रतिष्ठान मित्र मंडळ, श्री शंभो नारायण मित्र मंडळ, आई एकविरा सेवा संघ, संत रविदास युवा मंच, ऑल इंडीया धनगर समाज महासंघ, राणा प्रताप ऑटो रिक्षा स्टॅण्ड जुना जकात नाका, जय महाराष्ट्र ऑटो रिक्षा स्टॅण्ड थेरगाव, बघतोय रिक्षावाला फोरम व सकल धनगर समाज यांचे सहकार्य लाभले. तर श्री भोलेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ चिंचवडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पिटलच्या डॉ. नेहा हांडा, स्टाफ नर्स गीता चव्हाण, एमएसडब्लू आम्रपाली गायकवाड, सिनिअर टेक्निसियन रेणूक मत्लेपु, योगिता ससाणे, सुमित्रा गोडसे, शिवाजी सोळंके, प्रविण सुर्वे, शांताराम चोरगे यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले.