मल्हार आर्मीच्या जिल्हाध्यक्षपदी राहुल मदने यांची निवड

मल्हार आर्मीच्या जिल्हाध्यक्षपदी राहुल मदने यांची निवड

पिंपरी : आज समाजासाठी नेतृत्व करणारे अनेक आहेत. पण त्यातच प्रामाणिक आणि सचोटीने नेतृत्व करणारे फार कमी आहेत. त्याचबरोबर आता नेतृत्व करणारे लोकांच्या गरजांकडे पाठ फिरवून नेतृत्व करण्याचा देखावा करतात. नेतृत्व की हुकूमशाही? असा प्रश्न आज सर्वाना पडलाय. मग हे चित्र बदलायला आता आपण तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा हे ही खरं.

प्रस्थापित नेते एखाद्या समाजाच्या समस्यांकडे पाठ फिरवतात, दुर्लक्ष करतात. मग दुर्लक्षित समाजाची दखल घ्यायला भाग पाडण्यासाठी हाच तरुण वर्ग पुढे सरसावतो आणि आपल्या समाजाचं नेतृत्व करतो. या जुन्या नेतृत्वाखाली काही साध्य होणार नसेल तर तरुणांनी नेतृत्व करणं चुकीचं आहे असं म्हणणं मूर्खपणाचं लक्षणं आहे. आज प्रस्थापित नेतृत्व असणारे लोक फक्त सत्तेसाठी आणि मोठेपणा करण्यासाठीच आपलं नेतृत्व करतायत. अशा लोकांच्या सत्तेला धक्का देण्याची ताकद तरुण नेतृत्वात आहे याला दुमत नाही. जर प्रत्येक तरुण आपल्या समाजासाठी झटला, अथवा तसं नेतृत्व केलं तर हे नवं नेतृत्व देशाला महासत्ता बनवू शकेल यात शंका नाही.

मल्हार आर्मीच्या जिल्हाध्यक्षपदी राहुल मदने यांची निवड

भूम परंडा उस्मानाबादचा बुलंद आवाज मल्हार आर्मीचे संस्थापक व जय हनुमान ग्रुपचे संस्थापक गोरगरिबांचे कैवारी सुरेशभाऊ कांबळे उपस्थित राहून राहुल मदने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच पुढील समाजकार्य करण्यास मल्हार आर्मीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड केली.

त्यावेळी तसेच माजी नगरसेवक सचिन चिंचवडे, शेखर चिंचवडे, एकविरा ग्रुपचे अध्यक्ष सुधीर वाल्हेकर, राजाभाऊ चिंचवडे, श्रीकांत धनगर, शिवाजी आवारे, कमलाकर गोसावी, रावसाहेब वायकुळे, नागनाथ वायकुळे, बिभीशन घोडके, विनोद बरकडे, दीपक भोजने व राहुल मदने मित्र परिवार आणि समाजातील समाज बांधव उपस्थित राहून मदने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच मल्हार आर्मी पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.