क्वारंटाईन सेंटरमधील काळवंडलेले दिवस?

क्वारंटाईन सेंटरमधील काळवंडलेले दिवस?

प्रा. डॉ. किरण मोहिते

“कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्याने आपणास क्वारंटाईन व्हायला लागेल”, असं ऐकल्यावर धडकी भरली. “क्वारंटाईन कस होणार”, मी म्हणालो ऍम्ब्युलन्स काहीही पाठवू नका. मी ऍडमिट होण्यासाठी स्वतः येईल. असे सांगून मी क्वारंटाईन होण्यासाठी देहूरोड येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या महात्मा गांधी शाळेत गेलो. ‘एमजी क्वारंटाईन केंद्र देहूरोड’ असं फलकावर लिहलं होत. फलक अर्धा दुमड्डलेला अर्धा आ वासून कसाबिसा उभा होता. भीत-भीत गेट जवळच्या सुरक्षारक्षकाने हाताने इशारा करून खिडकीजवळ जायला सांगितले. खिडकीजवळ गेलो. जवळच्या मित्रांनी मला मास्क लावलेल्या चेहऱ्याकडे पाहून कसंबस ओळखलं. “का रे इथे कसा काय?” “अरे मला क्वारंटाईन व्हायला साघितलं आहे,” हे ऐकलंयावर कावऱ्या बावऱ्या नजरेने पाहत. दुसरीकडे तोंड वळविले. क्षणात मान वळवून निघून गेला.

खिडकीतून नर्सने आवाज दिला. आपलं नाव काय? मी नाव सांगितले. त्यानंतर उजवा हात पुढे करायला सांगून मधल्या बोटात ऑक्सीजन मीटरने चेक केले. अन विचारलं. शुगर बीपी सर्दी-खोकला-ताप काय आहे का? मी ताडकन म्हणालो. मला काही नाही होत. लगेंच डाव्या हातावर दोन ते तीन कापडाच्या वोळकांड्या घातल्या. बीपी चेक केला. अन तो एका कागदावर मांडला. नर्स म्हणाली “पुढच्या खिडकीत जावा. तिथे साबण, मास्क घ्या”. मी दबत दबत दुसऱ्या खिडकी जवळ गेलो सर्व काही साहित्य घेतलं. दोन्ही हातात बेगा, मेडिसिनच्या गोळ्या घेऊन, कसाबसा गेटजवळ आलो. शाळेचा गेटला लॉक केले होते. सुरक्षारक्षकाने पळत येऊन गेटचे लॉक उघडले. गेट पूर्णपणे गजंलेलं. लॉकची कळा तशीच दिसत होती. सुरक्षारक्षकाने कसबसं गेट उघडल. आवाज कडकड करत दरवाजा उघडला, असा भास झाला की मी तुरुंगात प्रवेश करीत आहे, आपणास किती दिवस कुडत काढायचे? या विचाराने आत मध्ये प्रवेश केला.

एका वर्गात (वॉर्डात) मध्ये गेलो. आतून आवाज आला. फॅमिली वॉर्ड आहे. तिथेच थबकलो. अन दुसऱ्या वार्डमध्ये प्रवेश केला. “अहो हे लेडीज वॉर्ड आहे.” असे कोणीतरी म्हटल्यावर, मी परत दोन्ही पिशव्या घेऊन बाहेर आलो. परत तिसऱ्या वॉर्डमध्ये प्रवेश केला. मी म्हणालो फुल आहे का? हो येथे पूर्ण पणे फुल पेशंट आहे. चौथ्या वॉर्डमध्ये आलो. तिथे पूर्णपणे मोकळा वॉर्ड होता. चौहोकडे नजर फिरवली. पूर्णपणे वर्ग फळ्यांनी भरला होता. एका फळ्यावर सुविचार, विरुद्धार्थी शब्द, भजन, गाणी, संख्या वाचन, लिंग, वचन, पाढे, बर्थ एनिवर्सरी, यांनी पूर्णपणे विद्यार्थ्यांनी फळा पूर्ण पणे भरवला होता. एका वर्गात सर्वसाधारण आठ खाट्टा मांडल्या होत्या. सर्वसाधारण अंतर पाच फुटावर होतं. खाटावर गादी, २ उशा, स्वच्छ धुतलेली चादर, पांघरलयाला स्वच्छ अशी ब्लँकेट, कपडे धुण्यासाठी साबण, अंघोळी साठी साबण देऊन उत्तम पाहूण्यासारखं आमचं स्वागत केलं होतं.

बॅगा एका बाजूला ठेवल्या. सर्व साहित्य बाजूला मांडलं. अन लोळत बसलो. वॉर्डमध्ये सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर बैलाला जशा मुसक्या बांधाव्या तसे सर्वांची तोंड मास्कनी बांधली होती.

जवळच्याला विचारलं किती दिवस झाली ऍडमिट होऊन. त्यानं सांगितले आजचा ९ वा दिवस. उद्या मला सोडणार आहे, म्हणजे जवळ जवळ १० दिवस थांबायचं. माझे तर डोळे फिरू लागले. छातीत धडधड वाढू लागली. भरपावसात घाम फुटला. त्याला विचारलं काय काय होत आहे? तो म्हणाला काही नाही ताप उतरत नव्हता. तोंडाला चव नाही. कडू कडू सर्व काही लागतंय. आंबट, खारट, तिखट काहीही चव कळत नाही त्याची सर्व काही लक्षण सांगत होता. ५ दिवसासाठी दिलेली पाच पाकीट मधील एक एक गोळी एका वेळेला खायची. आणि सात दिवसासाठी निरिक्षणासाठी ठेवतात. पाच दिवसानंतर फरक नाही पडला तर अथवा दोन दिवसानंतर फरक नाही पडला तर मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात.

माझे प्रश्न वाढतच होते. जेवणाचं कसं काय? त्यांनी उत्तर दिल्यावर मला हलक फूलक वाटलं. सकाळचं गरमा गरम नाश्ता त्याबरोबर एक उकडलेल अंड, दुपारी १ वाजता जेवण, ४ वाजता चहा, अन् रात्री ८.५० वाजता जेवण. जेवणामध्ये तीन पोळी. एक पातळ भाजी, कांदा, डाळ भात, एवढ्यात पोट टम्म भरून जात. अन आठव्या दिवशी स्वतःचे चार चाकी वाहनाने किंवा रिक्षाने घरी डिस्चार्ज देणार, मात्र दोन चाकी वाहन असेल तर डिस्चार्ज दिला जात नाही. नाहीतर शेवटचा पर्याय ऍम्ब्युलन्स. सर्व काही सांगत असताना मी मात्र कान लावून ऐकत होतो.

शाळेमधील स्वच्छतागृह देखील स्वच्छ. अंघोळीसाठी गरम पाणी, हात धुण्यासाठी वेगळी जागा, अंघोळीसाठी प्रेत्येक वॉर्डमध्ये वैयक्तिक बादली. सर्व काही घरच्यागत सुविधा. रोजच्या रोज वॉर्ड बॉय पीपीई किट घालून लादी स्वच्छ करतात.

तपासणीसाठी दररोज तीनदा डॉक्टर नावाप्रमाणे पुकारून सामाजिक अंतराचे भान ठेवून रांगेत उभे राहायचे. नाव येईल तेव्हा डॉक्टर ऑक्सिजन मीटरने तपासून, बीपी चेक करून, बुलेटने टेंपरेचर चेक करून त्याच्या नोंदी करतात. त्यावर शेवटी आठव्या दिवशी रुग्णाला सोडायचे की नाही ते ठरवतात. रुग्नाला आठ दिवसापर्यंत बर नाही वाटलं तर पुढे काही दिवस रुग्णाला ठेवतात, नाहीतर दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करतात.

करोना रोग म्हणजे अंतिम विधी प्रकार. असा काही जणांचा समज. परंतु असे काही नाही. सात दिवस म्हणून क्वारंटाईन केंद्रावर. परत घरीं सोडल्यावर सात दिवस होम क्वारंटाईन. असा १४ दिवस वनवास भोगायचा. १४ दिवसानंतर परत टेस्ट करायची. नॉर्मल असेल तर महिन्याभर काळजी घ्यायची, अन्यथा नाहीतर परत ऍडमिट व्हायचे.

एका डॉक्टरला विचारले की सर्वच काही रुग्ण पॉझिटिव्ह येतात का? डॉक्टर म्हणाले नाही. आज शंभर जणांची तपासणी केली असता त्यातले फक्त २३ जण फक्त पॉझिटिव्ह आले आहेत. सर्व काही डॉक्टरने समजून सांगितल्यानंतर खात्री पटली की सर्वच पेशंट पॉझिटिव्ह येत नाहीत. परंतु सरकारी हॉस्पिटलवाल्यांना एका रुग्णामागे किती अनुदान भेटते हे उत्तर मात्र अनुत्तरित राहील.

करोना हा व्हायरस नाही, बहुसंख्य लोकांना येऊन गेला तरी काहीजणांना कळलं सुद्धा नाही. समोरचा रुग्ण पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे सर्व ठरवताना डॉक्टरच्या हाती असतं कारण माझ्या शेजारील दोन रुग्ण ओरडत होती. मला काही नसताना सात दिवस क्वारटाइन करून ठेवलं आहे.

सर्व सामान्य माणसाला जरासा खोकला आला तर डॉक्टर हात न लावता सहज पणे म्हणतात कोरोना टेस्ट करून घा. वरून प्लास्टिकचा चिलखत. तोंड पूर्ण पणे झाकलेल. बूट, मौजे, पूर्णरित्या प्लास्टिकने बंद जणू काही ती व्यक्ती चंद्रावर उतरली आहे. असा पोशाख असला तरी डॉक्टर, नर्सचा रिपोर्ट पॉसिटीव्ह येत आहे, मला तर असं वाटत आहे की पॉसिटीव्ह, निगेटिव्ह, हे चीनवरून आलेलं एक नूडल्स आहे. सध्या हे फ्याड घराघरात पोहचत आहे. लस येणार ही फक्त भाबडी अशा बाळगायची अन जीवन जगत राहायचं.

क्वारंटाईन करण्यासाठी ऍम्ब्युलन्स गाडी येते. सर्व काही देखाव्याचा प्रकार. गावभर एकच चर्चा. आजूबाजूवाल्यांचा मानसिक त्रास. सार्वजनिक नळावर पाणी भरण्यास मनाई. नजरनजरेत मतभेद. इतर लोकांमध्ये कुजबुज. काही लोकांना आनंद मावेनासा होतो. कोणाचीही गाटभेट नाही, फोन नाही भेटायला आला तरी लांब अंतरावर बोलणे. एकच शंका याला कोरोना झाला आहे.

आज जगात मुत्यूचे प्रमाण वाढत आहे. बीपी शुगर, न्यूमोनीया, याचा जास्त उहापोह झाला की रुग्ण पूर्णपणे दगावतो. दुसरं कारण म्हणजे दबाव, ताण होय. रुग्ण पूर्णपणे घाबरला तर पूर्णपणे संपतो. क्वारंटाईन केंद्र म्हटलं की, समाजातील माणसं डोळे फिरवतात. कानाडोळा करतात. पण आज जगात पोलीस, डॉक्टर, नर्स हे देव रूपाने संपर्कात राहून काम करतात त्याचं काय?

क्वारंटाईन केंद्रात मोठी स्क्रीन असलेली टीव्ही. तरुण वर्ग, लहान मुलं, म्हातारी माणसं, मस्त घराच्यागत टीव्ही दिवसभर पाहत बसत होते. दिवस भर लाईट, जनरेटरची सोय, रात्रभर फॅन, मनसोक्त आनंद लोटायाचा बस्स.

खासगी रूग्णालयात साध्या खोकल्याचा बिल दोन ते तीन लाखापर्यंत सहज जात तो एक डॉक्टरचा पूर्णपणे धंदा झाला आहे. समाजानं तिरस्कार न करता माणुसकी नात्याने पाहिलं तरी त्या रुग्णाचा नाहक त्रास कमी होण्यास मदत होईल. खरं तर माणसाची मानसकिता बदलायाला हवी पण तितकंच खरं आहे, की कधीच बदलानार नाही. आता खरी माणुसकी, आपुलकी, जिव्हाळा, समाजात लोप पावत चालली आहे.

हा रोग असा आहे की घरात एकाला झाला की, घरातील सर्व लोकांना क्वारंटाईन केंद्रात डांबून ठेवतो. आज मीडियाने केलेल्या गागोरामुळे भीती दडपण वाढत आहे. पूर्णपणे खचतो अन मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. खरंच सात दिवस म्हणजे काळवड्डलेले दिवस नव्हते. कोरोना रोगातील उलगडा करणारे दिवस होते. क्वारंटाईन केंद्र म्हणजे एक प्रकारचे पाहुण्याचे स्वागत करणारे केंद्रच होते.