प्रहार जनशक्ती पक्षाच्या पिंपरी चिंचवड सहचिटणीसपदी चंद्रकांत उदगीरे यांची निवड

प्रहार जनशक्ती पक्षाच्या पिंपरी चिंचवड सहचिटणीसपदी चंद्रकांत उदगीरे यांची निवड

पिंपरी : प्रहार जनशक्ती पक्षाच्या पिंपरी चिंचवड सहचिटणीस पदी चंद्रकांत उदगीरे यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे जिल्हा संघटक शिवश्री निरज कडू पाटील यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे.

नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, आपल्या सामाजिक कार्याची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या आदेशावरून तसेच पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लुभाऊ जवंजाळ व पक्ष प्रवक्ते अजय महाराज बारस्कर यांच्या सुचनेवरून नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत चंद्रकांत उदगीरे म्हणाले की, प्रहार जनशक्ती पक्षमध्ये नंदकिशोर जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहर सहचिटणिस व कामगार उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. माझ्यावर जो विस्वास ठेवला आहे. त्या विस्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रहार जनशक्ती म्हणजेच गोरगरिब जनतेचे प्रश्न सोडवणे त्यांना निस्वार्थपणे न्याय मिळून देणे. मी पूर्वीपासून समाजातील अन्यायाविरुद्ध कामे करतच आहे. चुकीच्या ज्या गोष्टी घडतील त्या अन्यायाविरूद्ध जीवात जीव असेपर्यंत लढणार आहे.८