पिंपरी, ता. २ जानेवारी : उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने सन २०२२ या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. चिंचवड (Chinchwad) विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांच्या पिंपळे गुरव (Pimple Gurav) येथील कार्यालयात हा प्रकाशन सोहळा पार पडला. याप्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, चेतन घुले, शशिकांत कदम, सतीश कांबळे, सागर बिरारी, सतीश काटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या दिनदर्शिकेचे वितरण कुंदाताई भिसे आणि संजय भिसे यांनी पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) प्रभागातील घरोघरी जाऊन केले. त्यामाध्यमातून प्रभागातील नागरिकांशी विविध मुद्द्यांवर सुसंवाद साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यावेळी नागरिकांनीही त्यांचे मनापासून स्वागत करून उन्नती सोशल फाउंडेशनच्या कार्यामध्ये आम्ही कायम सोबत असल्याची ग्वाही दिली. नागरिकांशी साधलेल्या संवादातून कुंदाताई भिसे यांनी त्यांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेतले.
सदर दिनदर्शिकेमध्ये उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या सामाजिक कार्याचा तसेच विविध उपक्रमांचा सचित्र आढावा घेण्यात आला असून नागरिकांकडूनही या दिनदर्शिकेचे कौतुक करण्यात येत आहे. सुमारे ३० हजार दिनदर्शिकेचे यावेळी वितरण करण्यात आले.
दरम्यान, आमदार लक्ष्मण जगताप यांनीही उन्नती सोशल फाउंडेशन(Unnati Social Foundation) आणि भिसे दांपत्यांच्या कार्याचे आणि वैविध्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करीत भविष्यात अशाचप्रकारे चांगले उपक्रम सातत्याने राबविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.