डाळ स्वच्छ धुवून 3/4 तास भिजत घालावी, साधारण तिप्पट पाणी घालून शिजत ठेवणे किंवा कुकरला शिजवून घेणे (४ शिट्या).
डाळ शिजत आहे, तोपर्यंत गुळ चिरून घेणे व डाळ शिजल्यानंतर पाणी असेल तर आटवणे. त्यानंतर डाळीत गुळ घालावा व चांगले आटवावे, त्यानंतर पुरण पुरणयंत्रातून करून घ्यावे. पुरणामध्ये वेलची, जायफळ, सुंठ, बडीशेप पावडर घालून मिक्स करावे.
डाळ शिजत असेपर्यंत मैदा मळून घ्यावा. मैद्यामध्ये 1/2 टीस्पून मीठ घालावे व 60 मिलीतेल घालून चोळून घेणे, 120 मिलीमीटर पाणी हळूहळू मैद्यात घालून मैदा सैलसर भिजवून झाकून ठेवणे. (अडीच कप मैद्यासाठी अर्धा कप तेल नि एक कप पाणी लागते)
या पुरणामध साधारण 30/35 पुरणपोळ्या होतात, तेवढे पुरणाचे गोळे करणे.
साधारण पुरणाच्या निम्मे पिठ घ्यावे व त्यात पुरण घालून गोळे करावेत, एका वेळी चार पाच करावेत, तवा गॅसवर तापत ठेवावा व एक-एक पोळ्या एकदम पातळ लाटाव्यात.
पोळी भाजताना एकदा उलट केली कि, ती तव्यावर वर-खाली तुप लावणे, ही साधी पध्दत आहे, तूप तव्यावर न लावता पण पोळ्या भाजता येतात. मऊ व लुसलुशीत पोळ्या तयार झाल्या की, दुधाबरोबर, तुपा बरोबर खाऊ शकता.