धनंजय मुंडेंच्या मुंबईतील जनता दरबारास पुन्हा सुरुवात; पहिल्याच दिवशी अभ्यागतांच्या रांगा

धनंजय मुंडेंच्या मुंबईतील जनता दरबारास पुन्हा सुरुवात; पहिल्याच दिवशी अभ्यागतांच्या रांगा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद चंद्र पवार यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘थेट मंत्री व जनता यांची भेट – जनता दरबार’ अंतर्गत मुंबई पक्ष कार्यालयातील जनता दरबारास सोमवार (दि. 04) पासून पूर्ववत सुरुवात झाली असून, आजपासून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जनता दरबारास सायंकाळी 4 ते 6 या वेळेत सुरुवात झाली आहे.

आज या जनता दरबारात अभ्यागतांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. जनता दरबारात भेटीस आलेल्या प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेत, त्यांच्या काम किंवा अडचणीचा तोडगा जागीच काढणे, संबंधितांस फोन वरून सूचना देत किंवा आवश्यक तेथे पत्र देऊन इत्यादी मार्गांनी समोरच्या व्यक्तीने काम जागच्या जागी मार्गी लावणे, हे धनंजय मुंडे यांच्या जनता दरबाराचे वैशिष्ट्य मानले जाते; त्यामुळे आज त्यांच्या जनता दरबारास नेहमीप्रमाणे मोठी गर्दी पहावयास मिळाली.

मागील दोन वर्षांच्या काळात कोविड विषयक निर्बंधांमुळे हा जनता दरबार उपक्रम काही काळासाठी स्थगित करण्यात आला होता, मात्र आता संपूर्ण निर्बंध हटवल्यामुळे जनता दरबार पूर्ववत सुरू राहणार असून, याअंतर्गत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे नागरिक व कार्यकर्त्यांना भेटीसाठी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात दर मंगळवारी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत उपलब्ध असणार आहेत.