श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

पिंपरी : शिवजयंती निमित्त शिवरायांच्या मूर्तीचे व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी पोवाडे व मनोगते सादर केली.

त्याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या सुनीता नवले, उपमुख्याध्यापिका, मनीषा जैन, पर्यवेक्षक सुभाष देवकाते, विभाग प्रमुख संतोष शिरसाट, शिक्षक प्रतिनिधी सोनवणे स्मिता, सावळे एस. एस. यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी यथार्थ मिस्तरी, खैरे प्रतीक, विनित गाढवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेषभूषा तसेच दर्शन कदम, रितेश लटपटे व ओंकार गायकवाड या विद्यार्थ्यांनी जिजाऊंची वेशभूषा अप्रतिम केली होती. विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका जैन मनीषा यांनी आपल्या प्रास्ताविकात शिवरायांची महती स्पष्ट केली.

आव्हाड श्रीधर यांनी आपल्या मनोगतात शिवरायांची दूरदृष्टी व स्वराज्य स्थापनेची राजांना असलेली ओढ याची माहिती दिली. तर अध्यक्षीय भाषणात विद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या सुनीता नवले यांनी शिवरायांना आदर्श राज्यकर्ता का म्हटले गेले, याची माहिती दिली.

संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी अॅड राजेंद्रकुमार शंकरलाल मुथा व सहाय्यक सेक्रेटरी अनिलकुमार मोतीलाल कांकरिया यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललवाणी एस. एच. यांनी केले व उपस्थितांचे आभार विभाग प्रमुख शिरसाट संतोष यांनी मानले.