रहाटणीत आरोग्य तपासणी व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रहाटणीत आरोग्य तपासणी व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
  • शिवजयंतीनिमित्त गणेश शिवराम नखाते सोशल फाउंडेशनतर्फे केले होते आयोजन

रहाटणी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रहाटणीत गणेश शिवराम नखाते सोशल फाउंडेशनच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धा व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेला मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर अनेक नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला

सामाजिक कार्यकर्ते गणेश नखाते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी शिवराम नखाते, अमृत नखाते, सुनिल नखाते, भास्कर दाते, बालाजी वांजे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, चित्रकला स्पर्धेत शिवाजी महाराज, संभाजी महाराज व त्यांच्या जीवनावरील प्रसंग यांचे एक चित्र मुलांना रेखाटायचे होते. तसेच आरोग्याची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे, या भावनेतून या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रक्तातील साखर तपासणी व रक्तदान तपासणी करण्यात आली. असे गणेश नखाते यांनी सांगितले.

याबाबत गणेश नखाते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक व्यक्तीमत्व आहे. अशा महान राजाची महती व विचार लहानपणापासूनच मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न म्हणून ही चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.