Tag: Shivjayanti

शिवजयंतीचा वाद का?
विशेष लेख

शिवजयंतीचा वाद का?

डॉ. श्रीमंत कोकाटे आपल्या देशात अनेक महापुरुष होऊन गेले, कोणत्याही महापुरुषांच्या जयंतीचा वाद नाही, मग शिवजयंतीचाच वाद का? शिवाजीराजांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव आज देखील इतका आहे की त्यांच्या कार्याला पदोपदी विरोध करणाऱ्यांना शिवजयंतीचा वाद घालून त्यांच्या कार्याचे महत्व कमी करण्याचा खोडसाळपणा करावा लागतोय. शिवाजीराजांच्या कार्याचा प्रभाव जगभर जाऊ नये, त्यांचे कृषी धोरण, युद्ध धोरण, प्रशासन धोरण, आरमार, महिला विषयक धोरण, स्थापत्यशास्त्र, धार्मिक धोरण, गुप्तचर यंत्रणा, समतावादी तोरण, बुद्धिप्रामाण्यवाद इत्यादी विषयावर चर्चा होऊ नये. जयंतीचा वाद निर्माण करून सनातनी व्यवस्थेने छत्रपती शिवाजीराजे यांची अवहेलना सुरू ठेवलेली आहे. त्यांच्या जागतिक प्रभावाला पायबंद घालण्यासाठी शिवजयंतीचा वाद निर्माण केला जातो. कोणत्याही व्यक्तीचा जन्म एकदाच होतो. तो तीन-तीन होत नाही. तीन वेळा ...
रहाटणीत आरोग्य तपासणी व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड

रहाटणीत आरोग्य तपासणी व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवजयंतीनिमित्त गणेश शिवराम नखाते सोशल फाउंडेशनतर्फे केले होते आयोजन रहाटणी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रहाटणीत गणेश शिवराम नखाते सोशल फाउंडेशनच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धा व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेला मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर अनेक नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला सामाजिक कार्यकर्ते गणेश नखाते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी शिवराम नखाते, अमृत नखाते, सुनिल नखाते, भास्कर दाते, बालाजी वांजे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, चित्रकला स्पर्धेत शिवाजी महाराज, संभाजी महाराज व त्यांच्या जीवनावरील प्रसंग यांचे एक चित्र मुलांना रेखाटायचे होते. तसेच आरोग्याची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे, या भावनेतून या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन...
थेरगावात शिवजयंती निमित्त कचरावेचक महिलांना साडी वाटप करून सन्मान; दोन हजार जणांना अन्नदान तर १२२ जणांचे रक्तदान
पिंपरी चिंचवड

थेरगावात शिवजयंती निमित्त कचरावेचक महिलांना साडी वाटप करून सन्मान; दोन हजार जणांना अन्नदान तर १२२ जणांचे रक्तदान

थेरगाव (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कचरावेचक महिलांना साडी वाटप करून सन्मान करण्यात आला, तसेच रक्तदान शिबिरात १२२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दोन हजार लोकांना अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शाकीर शेख व मयुर कॉलनी मित्र मंडळ केले होते. या कार्यक्रमाला शहरातून व प्रभाग क्रमांक ३५ मधून शेकडो कार्यकर्त्यांसह सुमारे ४० महिला बचत गटांनी सहभाग नोंदविला. त्यावेळी थेरगावचे युवा नेते तानाजी बारणे, शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी शहर प्रमुख हाजी दस्तगीर मणियार, काळूराम बारणे, स्विकृत सदस्य नगरसेवक संदीप गाडे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, संभाजी बारणे, विनोद पवार, रवी भिलारे, नगरसेवक कैलास बारणे, नगरसेवक अभिषेक बारणे, भारत केसरी विजय गावडे, राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप पवार, नगरसेवक चंद्रकांत नखाते, प्रवीण बारणे, सामाजिक कार्यकर्ते दीपक चखाले, स...
शिवजयंती निमित्त पायी शिवज्योत मशाल रॅली
पिंपरी चिंचवड

शिवजयंती निमित्त पायी शिवज्योत मशाल रॅली

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराज उदयनराजे ट्रस्टच्या वतीने डांगे चौक ते काळेवाडीतील विजयनगर असे पायी शिवज्योत मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. राजे प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर आयोजित शिवजयंती उत्सव शिव साम्राज्य प्रतिष्ठान व शिवसंघर्ष मित्र मंडळ यांच्या सौजन्याने पार पडला. डांगे चौक ते शिव साम्राज्य चौक अशी शिव ज्योत रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये थेरगाव गावठाण, अष्टविनायक मित्र मंडळ, आदर्श चौक, पंचनाथ चौक, चांगभलं चौक इत्यादी ठिकाणी ज्योतीचे दर्शन केले गेले. त्यानंतर शिव पुजन, शिव आरती, मर्दानी खेळ व शेवटी फळ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील तात्या पालकर व इरफान शेख, राजे प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहराचे कार्याध्यक्ष मोसिन शेख, उपाध्यक्ष रवी पारध...
काळेवाडीतील राधेश्याम गोशाळेत शिवजयंती उत्साहात साजरी
पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील राधेश्याम गोशाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

काळेवाडी : येथील राधेश्याम गोशाळेत श्री स्वामी समर्थ ग्रुपच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी मुलांनी शिवरायांवर भाषणे, गीते, पोवाडे सादर केली. त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनिल तात्या पालकर, उमेश गुंड, श्री स्वामी समर्थ ग्रुपच्या संस्थापिका समिता समीर सुतार, राधेश्याम गोशाळेचे संचालक भगत गुरनानी, प्रकाश मूलचंदानी यांच्यासह मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ तसेच सरदार व मावळ्यांची वेशभूषा करून शिवचरित्र सादर केले. शिवरायांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता. या कार्यक्रमाला तात्या पालकर यांचे विशेष सहकार्य लाभले. दरम्यान, पालकर यांच्या हस्ते काळेवाडीतील महाराज उदयन...
शिवजयंती निमित्त काळेवाडीत रॉयल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम | तरूणांना करिअर मार्गदर्शन तर महिला योजनांची केली जनजागृती
पिंपरी चिंचवड

शिवजयंती निमित्त काळेवाडीत रॉयल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम | तरूणांना करिअर मार्गदर्शन तर महिला योजनांची केली जनजागृती

काळेवाडी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : रॉयल फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त मुलांना खाऊ वाटप, तरूणांना करिअर मार्गदर्शन करण्यात आले तर महिलांना विविध सरकारी योजनांची माहिती देण्यात आली. तसेच रॉयल फाउंडेशनच्या माध्यमातून काळेवाडीत मोहल्ला क्लिनिक सुरू केले जाणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. भारत माता चौक व रॉयल एकता चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रवि नांगरे, ज्येष्ठ सल्लागार प्रकाश नांगरे, आनंद काटे, नरेंद्र नांगरे, पंकज पाटोळ, अशोक गायकवाड, खजिनदार गणेश नांगरे, प्रथम नांगरे, विक्की साळवे, अमित बोंगाळे, सागर पवार, विजय साळवे, सिद्धार्थ कसबे, रिहान शेख, सागर शेठ, अक्षय ताम्हणकर, निखिल ताम्हणकर, उध्दव डेरवणकर, आशा नांगरे, राधा ...
मोफत रोप देण्यासाठी नर्सरी उभारण्याचा शिवजयंती निमित्त संकल्प
सामाजिक

मोफत रोप देण्यासाठी नर्सरी उभारण्याचा शिवजयंती निमित्त संकल्प

चिंचवड : इंजिनियरिंग क्लस्टर, उज्ज्वला मेमोरियल फाऊंडेशन आणि निसर्गराजा मित्र जीवांचे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आपले स्वराज्य हरित करण्यासाठी मोठ्या प्राणावर वृक्षारोपण होणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोपांची गरज असते. ही गरज ओळखून तीनही संस्थानी मिळून मोफत रोप देण्यासाठी नर्सरी उभी करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात मोरया इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी, त्यांचे शिक्षक तसेच तीनही संस्थांचे स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी २००० पिशव्या माती आणि खताने भरण्यात आल्या. पुढील काळात सह्याद्रीच्या परिसरातील दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पतींच्या बिया जमा करून त्यांची रोप तयार केली जाणार आहे. चिंचवड येथील इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये १० हजार रोपांची नर्सरी उभी राहत आहे, त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबवला गेला. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर घराघरांत हवा – कुंदाताई भिसे
पिंपरी चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर घराघरांत हवा – कुंदाताई भिसे

पिंपळे सौदागर येथील कुंदाताई भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवजयंती साजरी पिंपरी : शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्र करुन स्वराज्याची निर्मिती केली. त्यांनी दिलेला एकतेचा वारसा नव्या पिढीने जतन केला पाहिजे. शिवराय सर्वांसाठी प्रेरणा शक्ती आणि स्फूर्ती देणारे उर्जास्त्रोत आहेत. संकटांचे संधीत रुपांतर करुन त्यांनी शत्रूवर मात केली. त्यांचा आदर्श सर्वानीच घेतला पाहिजे. जगभरात ज्यांच्या कुशल राज्य कारभाराची ओळख आहे, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर घराघरांत व्‍हावा, असे मत उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा भाजपा चिंचवड विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपळे सौदागर येथील कुंदाताई भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण...
शिवजयंती निमित्त अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे सफाई कामगारांना मिठाई वाटप
सामाजिक

शिवजयंती निमित्त अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे सफाई कामगारांना मिठाई वाटप

पिंपरी : अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने शिवजयंती निमित्त थेरगांव हॉस्पिटलमध्ये डाॅक्टर, नर्स, साफसफाई कामगार तसेच थेरगाव येथील कचरा डेपोतील ड्रायव्हर व कचरा वेचक महिलांना मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यावेळी अखिल भारतीय छावा संघटना प्रदेश महासचिव मनोज मोरे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राहुल धस, पश्चिम महाराष्ट्र सचिव अनसराज माने, पिंपरी चिंचवड सचिव श्रिकांत मलिशे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष वाहतुक आघाडी विकास डोंगरे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष विद्यार्थी आघाडी विजय हजारे, सामाजिक कार्यकर्ते विकास झांबरे, मयुर धस, ओमकार कानडे, दिगंबर सूर्यवंशी आदि कार्यकर्ते उपस्थित होते. ...
काळेवाडीत शिवजयंती उत्सव सोहळा उत्साहात
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत शिवजयंती उत्सव सोहळा उत्साहात

काळेवाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काळेवाडीत भव्य शिवजयंती उत्सव २०२२ सोहळा उत्साहात पार पडला. छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महिलांनी शिवजन्माचा पाळणा म्हटला तसेच शिव वंदना घेण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजन अष्टविनायक सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळ तसेच अनिल पालांडे, प्रताप सुर्वे व सोमनाथ नळकांडे यांच्या वतीने करण्यात आले. जयंती निमित्ताने डॉ. शैनाझ शेख यांच्या मदतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग आप्पा बारणे, हरेश आबा नखाते, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडागळे, नगरसेवक विनोद नढे, नगरसेविका निता पाडाळे, रवी लांडगे, माजी नगरसेवक...