शिवजयंती निमित्त पायी शिवज्योत मशाल रॅली

शिवजयंती निमित्त पायी शिवज्योत मशाल रॅली

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराज उदयनराजे ट्रस्टच्या वतीने डांगे चौक ते काळेवाडीतील विजयनगर असे पायी शिवज्योत मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते.

राजे प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर आयोजित शिवजयंती उत्सव शिव साम्राज्य प्रतिष्ठान व शिवसंघर्ष मित्र मंडळ यांच्या सौजन्याने पार पडला. डांगे चौक ते शिव साम्राज्य चौक अशी शिव ज्योत रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये थेरगाव गावठाण, अष्टविनायक मित्र मंडळ, आदर्श चौक, पंचनाथ चौक, चांगभलं चौक इत्यादी ठिकाणी ज्योतीचे दर्शन केले गेले.

त्यानंतर शिव पुजन, शिव आरती, मर्दानी खेळ व शेवटी फळ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील तात्या पालकर व इरफान शेख, राजे प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहराचे कार्याध्यक्ष मोसिन शेख, उपाध्यक्ष रवी पारधे, संघटक अजित रायकर, अतुल हडालिया, सुशांत डवरी, शैलेश दळवी, आशुतोष मुंडलिक, ओम क्षीरसागर आदी उपस्थित होते.