थेरगावात शिवजयंती निमित्त कचरावेचक महिलांना साडी वाटप करून सन्मान; दोन हजार जणांना अन्नदान तर १२२ जणांचे रक्तदान

थेरगावात शिवजयंती निमित्त कचरावेचक महिलांना साडी वाटप करून सन्मान; दोन हजार जणांना अन्नदान तर १२२ जणांचे रक्तदान

थेरगाव (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कचरावेचक महिलांना साडी वाटप करून सन्मान करण्यात आला, तसेच रक्तदान शिबिरात १२२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दोन हजार लोकांना अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शाकीर शेख व मयुर कॉलनी मित्र मंडळ केले होते. या कार्यक्रमाला शहरातून व प्रभाग क्रमांक ३५ मधून शेकडो कार्यकर्त्यांसह सुमारे ४० महिला बचत गटांनी सहभाग नोंदविला.

त्यावेळी थेरगावचे युवा नेते तानाजी बारणे, शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी शहर प्रमुख हाजी दस्तगीर मणियार, काळूराम बारणे, स्विकृत सदस्य नगरसेवक संदीप गाडे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, संभाजी बारणे, विनोद पवार, रवी भिलारे, नगरसेवक कैलास बारणे, नगरसेवक अभिषेक बारणे, भारत केसरी विजय गावडे, राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप पवार, नगरसेवक चंद्रकांत नखाते, प्रवीण बारणे, सामाजिक कार्यकर्ते दीपक चखाले, सागर गायकवाड, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, नगरसेवक शितल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते युनूस पगडी वाले, सामाजिक कार्यकर्ते असद पटेल, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य कोमल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे, युवा नेते विशाल बारणे, सागर बारणे, सागरजी लांगे, डॉ. इमरान बेग, माजी नगरसेविका विमल जगताप, सामाजिक कार्यकर्ते नूर खान, शिवसेना पदाधिकारी भाग्यश्री मस्के, पोलीस मित्र संघटनेच्या पदाधिकारी खरात, राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रशांत सपकाळ, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष शरद मस्के, सामाजिक कार्यकर्ते दीपक तरडे, जांबे गावचे युवा नेते अनुप गायकवाड, युवा नेते स्वप्नील भांडवलकर, थेरगावचे सामाजिक कार्यकर्ते खलील, शिवसेना पदाधिकारी पाशा पठाण, उद्योजक नईम पठाण, सामाजिक कार्यकर्ते संतोष कुरवत, सामाजिक कार्यकर्त्या आशा उजगिरे, माजी नगरसेविका उषा गजभार, मयूर कॉलनी संस्थापक-अध्यक्ष नईम पठाण, आयोजक शाकीर शेख मित्र मंडळ, मयूर कॉलनी मित्र मंडळ अध्यक्ष राजू चाऊस, शिववाहतूक संघटना पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष इर्शाद सय्यद, शकील बेग, रफिक खान, शौकत बेग, मुकेश चव्हान, रशिद शेख ,गालिब अरब यांच्यासह अखिल महाराष्ट्र फेरीवाला महासंघाचे सर्व पदाधिकारी, उत्तर भारतीय साडी सेल महासंघाचे सर्व कार्यकर्ते, महिला बचत गट, शेकडो महिला आणि थेरगाव येथील परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली.