काळेवाडीत शिवजयंती उत्सव सोहळा उत्साहात

काळेवाडीत शिवजयंती उत्सव सोहळा उत्साहात

काळेवाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काळेवाडीत भव्य शिवजयंती उत्सव २०२२ सोहळा उत्साहात पार पडला. छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महिलांनी शिवजन्माचा पाळणा म्हटला तसेच शिव वंदना घेण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजन अष्टविनायक सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळ तसेच अनिल पालांडे, प्रताप सुर्वे व सोमनाथ नळकांडे यांच्या वतीने करण्यात आले.

जयंती निमित्ताने डॉ. शैनाझ शेख यांच्या मदतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

काळेवाडीत शिवजयंती उत्सव सोहळा उत्साहात

या उत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग आप्पा बारणे, हरेश आबा नखाते, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडागळे, नगरसेवक विनोद नढे, नगरसेविका निता पाडाळे, रवी लांडगे, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, सुरेश नढे पाटील, ज्योती भारती, नवनाथ नढे, सामाजिक कार्यकर्ते दस्तगीर मणियार, रुपेश कदम, आनंद कोरहाळे, दिलीप काळे, विलास पाडाळे, बाळासाहेब नढे, गोरख पाटील, प्रदीप दळवी, नरसिंग माने, दत्ता गिरी, सावता महापुरे, विकास काजवे, गणेश वायबट, गणेश आहेर, अरुण हुमनाबाद, कानिफनाथ तोडकर, दत्ता पवार, बाळासाहेब येडे, आकाश बोरवणकर, सुजाता नखाते, वैशाली पालांडे, गार्गी सुर्वे, सपना नळकांडे, शारदा वाघमोडे, तस्लिम शेख, वंदना वायभट, गायत्री वीटकर, मीना वराट, रेखा बनसोडे, वनिता गवळी, ललिता ओडियार, शुभांगी पाचांकर, रेखा पाथरकर तसेच कार्यकर्ते अनिकेत डेरवणकर, भूषण सोनवणे, किशोर कदम, शुभम वानखेडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.