शिवजयंती निमित्त चिंचवडमध्ये गरजूंना कपडे वाटप

शिवजयंती निमित्त चिंचवडमध्ये गरजूंना कपडे वाटप

चिंचवड : मधुकर बच्चे युवा मंचच्या वतीने केशवनगर येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. जेष्ठ नागरिक पांडुरंग शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, आरती व शिवस्तोत्र म्हणत विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना कपडे वाटप करण्यात आले. तसेच पेढे वाटून शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.

त्यावेळी महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे, राजू कोरे, गणेश बच्चे, गोपाळ शिंदे, गौरव पवार, पोपट बच्चे, श्रीकृष्ण माळी, राजू ततापुरे, विजय कदम, रोहिणी बच्चे, गीता कोरे, अर्चना बच्चे, श्रावणी बच्चे, आसावरी बच्चे, अमित धारणे, सीताराम माळी, राजेश दहिवाड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी अनेकांनी महाराजांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे आयोजक मधुकर बच्चे यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांचे आभार मानले.