शिवजयंती निमित्त अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे सफाई कामगारांना मिठाई वाटप

शिवजयंती निमित्त अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे सफाई कामगारांना मिठाई वाटप

पिंपरी : अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने शिवजयंती निमित्त थेरगांव हॉस्पिटलमध्ये डाॅक्टर, नर्स, साफसफाई कामगार तसेच थेरगाव येथील कचरा डेपोतील ड्रायव्हर व कचरा वेचक महिलांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

त्यावेळी अखिल भारतीय छावा संघटना प्रदेश महासचिव मनोज मोरे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राहुल धस, पश्चिम महाराष्ट्र सचिव अनसराज माने, पिंपरी चिंचवड सचिव श्रिकांत मलिशे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष वाहतुक आघाडी विकास डोंगरे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष विद्यार्थी आघाडी विजय हजारे, सामाजिक कार्यकर्ते विकास झांबरे, मयुर धस, ओमकार कानडे, दिगंबर सूर्यवंशी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.