अभिमान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती साजरी

अभिमान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती साजरी

निगडी : प्राधिकरण मधील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अभिमान इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शाळेच्या आवारात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन केले.

इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनीने शिवगर्जना सादर केली. त्यामुळे सर्व वातावरण प्रसन्न होऊन विद्यार्थ्यामध्ये जोश निर्माण झाला. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा करून महाराजांचे प्रेरणादायी बोल सादर केले. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची वेशभूषा केली होती.

इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी महाराजांचा पोवाडा ‌आपल्या कणखर आवाजात सादर केला. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनीने शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणारे काव्य सादर केले. या सर्व कार्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.