स्मिता साठे यांची भारतीय लहुजी पँथर्सच्या प्रदेश महिला अध्यक्षपदी निवड

स्मिता साठे यांची भारतीय लहुजी पँथर्सच्या प्रदेश महिला अध्यक्षपदी निवड

पिंपरी : भारतीय लहुजी पँथर्सच्या प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षपदी स्मिता मल्हारी साठे यांची निवड झाली. भारतीय लहुजी पँथर्सचे संस्थापक-अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.

नवनियुक्त महिला प्रदेश अध्यक्षा स्मिता साठे या छत्रपती शिवाजी महाराज, लहुजी वस्ताद साळवे, महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णा भाऊ या महामानवांचे विचार समाजामध्ये रूजवतील.

तसेच त्या महाराष्ट्रामधील शोषीत, पिडीत बहुजन समाजातील महिलांचा प्रामुख्याने मातंग समाजामधील सामान्य महिलांचा बुलंद आवाज करतील आणि त्यांची सेवा करण्यासाठी त्याचबरोबर राज्यामधील महिला भगिनींवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कटिबद्द राहतील. असा विश्वास भारतीय लहुजी पँथर्सचे प्रदेश संघटक युवराज दाखले यांनी व्यक्त केला.