महापालिकेच्या अतिक्रमण पथारी हातगाडी सर्वसामान्यांची लूट थांबवा – बाबा कांबळे

महापालिकेच्या अतिक्रमण पथारी हातगाडी सर्वसामान्यांची लूट थांबवा - बाबा कांबळे

आयुक्त राजेश पाटील यांचे चैकाशी व कारवाई करण्याचे आश्वासन

गेल्या पाच वर्षाच्या पावत्यांची
चौकशी करण्यास यावी बाबा कांबळे यांची मागणी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून 8 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कारवाई केली जात आहे. रस्त्यावर, फुटपाथवर, फुटपाथलगत हातगाडी, पथारीवाले, वाहनांमध्ये व्यवसाय करणारे व्यावसायिक यांच्यावर रोज दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही कारवाई करताना नागरिक, व्यावसायिक यांची मोठी लूट केली जात आहे. ही लूट थांबवावी, अशी मागणी टपरी, पथारी, हातगाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली. तसेच दिलेल्या पावतीमधील रक्कमेमध्ये बदल करून पालिकेची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी बाबा कांबळे यांनी केली.

आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले. या वेळी ही मागणी करण्यात आली. या वेळी टपरी पथारी हातगाडी पंचायत कार्याध्यक्ष गजानन काकडे, उपाध्यक्ष प्रकाश यशवंत, सदाशिव तळेकर, उपस्थित होते.

बाबा कांबळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आले की, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर देण्यात येणाऱ्या पावती मध्ये महापालिका कर्मचारी फेरफार करून महापालिकेचीच फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. पावती देताना एक रक्कम दाखवली जात आहे. तर ओसी वर दुसरी रक्कम दाखवून सर्वसामान्य लोकांची लूट होत आहे.

एका प्रभागात सुमारे 50 पावती अशा 8 प्रभागात सुमारे 400 पावती दिल्या जात आहेत. या कारवाईने महापालिका कर्मचारी पालिका प्रशासनाच्या नजरेत धूळफेक फेक करत आहे. तर गरिबांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. कर्मचारी प्रशासनाला चुकीची रक्कम दाखवत आहे. त्यामुळे दिवसाकाठी सुमारे 4 लाख, महिनाकाठी 1 कोटी 20 लाख तर वर्षा अखेर 14 कोटी 40 लाखाची लूट कर्मचारी करत आहेत. पावती एकच असली तरी त्यावर रक्कम दोन नमूद करून फसवणूक केली जात आहे. दंड भरणाऱ्या सामान्य पावतीवरील रक्कम मायना वेगळा असून पावतीची स्थळप्रत (ऑफिस कॉपी) वरील मायना व रक्कम यामध्ये तफावत करून गोरगरीबांच्या पैशाचे अपहार करण्यात येत आहे.

त्यामुळे गोरगरिबांवरील कारवाई थांबवावी तसेच महापालिका कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा, टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला.