अजितदादांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका होती – युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख

अजितदादांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका होती - युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख

पिंपरी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी भाजपच्या भ्रष्टाचारावर हल्ला चढवत त्यांची खिल्ली उडवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता महापालिकेत असताना माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महापालिका आशिया खंडात सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून नावलौकिकास होती, आता या भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे महापालिका सत्तर नंबर वर येऊन पोचली आहे, याची आम्हाला लाज वाटते. अशी टिका मेहबूब शेख यांनी येथे केली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मुख्य समन्वयक योगेश बहल, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली “महागाईवर हल्ला चढवू या! मोदी सरकारला जाब विचारूया!” असे निषेध आंदोलन शनिवारी (ता. २) करण्यात आले. संत तुकाराम नगर पेट्रोल पंप ते आचार्य अत्रे नाट्यगृहपर्यंत हे भाजप सरकार विरुद्ध निषेध आंदोलन झाले. त्यावेळी मेहबूब शेख बोलत होते.

अजितदादांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका होती - युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख

त्यावेळी जेष्ठ नेते मोहम्मद पानसरे, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस प्रशांत सपकाळ, पंकज भालेकर, प्रसाद शेट्टी, संजय वाबळे, योगेश गवळी, विशाल वाकडकर, विशाल काळभोर, कार्याध्यक्ष नीलेश निकाळजे, चिंचवड कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे, प्रशांत काळेल, दिनेश पटेल, विधानसभा अध्यक्ष आयुष निंबाळकर, शारुख शेख, वेदांत माळी, शुभम पंडित सतेज परब, डॉ. अरुण शिंदे, योगेश मोरे, वीरेंद्र बेहेल, ओम क्षीरसागर, मेघराज लोखंडे, युवराज पवार यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की, निवडणूक आली की पेट्रोल डिझेल चे दर २-३ रुपये कमी करायचे, आणि निवडणूक संपली की रोज ८० पैसे प्रमाणे १० ते १५ रुपये वाढवायचे ही भाजप सरकारची चलाख वृत्ती जनतेने ओळखली पाहिजे. शहरात भ्रष्ट भाजपच्या विरोधात होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्च्यांना होत असलेली गर्दी पाहून भाजपच्या मनात धडकी भरली असून मतदारातून राष्ट्रवादी कॉंग्रेसला खुप चांगला प्रतिसाद मिळत, येणाऱ्या निवडणूकित जनता भाजपला हद्दपार नक्की करेल. आणि १०० पेक्षा जास्त नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडुन येतील, अशी खात्री बोलताना त्यांनी व्यक्त केली.

अजितदादांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका होती - युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख

इम्रान शेख म्हणाले की, “भडकलेल्या महागाईने त्रासलेल्या जनतेचे मूळ मुद्दे बाजूला ठेवून, मोदी सरकार नको त्या मुद्द्याला महत्त्व देऊन जनतेच्या प्रश्नांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे. महागाईने अति उच्चांक गाठलेला असून कधी नव्हे तेवढे पेट्रोल, डिझेल, गॅस, तेल याचे दर गगनाला भिडलेत यामुळे जनता त्रस्त आहे. यावर कुणी बोलायला तयार नाही. मोदी सरकारचे मंत्री वायफट बोलण्यामध्ये पटाईत आहेत. आम्ही पेट्रोलचे दर कमी करा म्हणले असता राज्य सरकार कडे बोट दाखवून तुम्ही व्हॅट कमी करा, असे प्रतिप्रश्न विचारत असतात. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माझी केंद्र सरकारमध्ये खुप वजन आहे, असे वारंवार बोलत असतात, तर त्यांनी महाराष्ट्र सरकार चा ४५ हजार कोटी जीएसटीची रक्कम परत द्यावी. आम्ही आदरणीय अजितदादा यांना सांगून व्हॅट कमी करायला लावू आणि वेळ पडली तर फडणवीस यांची टाकी फुल राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे केली जाईल.”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व मुख्य समन्वयक योगेश भाई बहेल यांनी यावेळी सांगितले की, नागरिकांना कमी पैशात सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर दोन हजार चौदा पेक्षा कमी असताना सुद्धा आज २०१४ च्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पन्नास रुपयाची तफावत आहे, तर गॅस सिलेंडर मध्ये चारशे ते पाचशे रुपये या आठ वर्षात मोदी सरकार यांनी वाढवले आहेत. युवकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन देऊन सरकारमध्ये येणाऱ्या मोदी सरकार यांनी युवकांना पकोडे तळा असे आवाहन केले. पण, व्यवसायिक सिलेंडरचे दर काल अडीचशे रुपयांनी वाढवले हे पाहता पकोडे तरी कसे तळावे हा प्रश्न तरुणांना व्यवसायिकांना पडलाय. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

रविकांत वरपे म्हणाले की, काश्मिरी पंडितांना पळविण्या मागे लालकृष्ण अडवाणी आणि विपी सिंग यांच अपयश. नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम विरुद्ध बोलायचं आणि ओवेसी यांनी हिंदू बद्दल विरुद्ध बोलायचं आणि हे असं साटंलोटं ठेवून हे राजकारण खेळत आहेत. जेणेकरून हिंदु-मुसलमानांमध्ये तेढ निर्माण व्हावा आणि त्याचा फायदा राजकारणामध्ये नकळत भाजप पक्षाला व्हावा. अशी रणनीती त्यांनी आखली आहे.