अपना वतन संघटनेतर्फे पिंपरीत मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर ‘विचारमंथन शिबीर’

अपना वतन संघटनेतर्फे पिंपरीत मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर 'विचारमंथन शिबीर'
  • समाज व देशाला पुढे नेहण्यासाठी मुस्लिम समाजात शैक्षणिक क्रांतीची गरज – सर्वपक्षीय मुस्लिम नेत्यांचा एकसूर

पिंपरी : अपना वतन संघटनेच्या वतीने पिंपरी येथील अल्पाइन हॉटेल मध्ये पिंपरी चिचंवड शहरातील मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर एकदिवसीय “विचारमंथन शिबीर” आयोजित करण्यात आले होते. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पिंपरी चिचंवड एजुकेशन सोसायटीचे सचिव गुलाम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विचारमंथन शिबिरात पिंपरी चिचंवड शहरातील मुस्लिम समाजातील सर्वपक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पिंपरी चिचंवड शहरातील मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शहरातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी शहरातील उर्दू शाळा, मुस्लिम विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती, समाजातील गरीब दुर्बल घटकांच्या वैद्यकीय गरजा, रोजगार, करिअर मार्गदर्शन शिबिरे, ग्रंथालय, कायदेशीर सल्ला केंद्र, कौटुंबिक कलह, आरक्षित असलेल्या परंतु ताब्यात नसलेल्या कब्रस्तानच्या जमिनी, वक्फ बोर्डाच्या जमिनींवरील अतिक्रमण, सांस्कृतिक भवन, व्यसनमुक्ती केंद्र, मुस्लिम आरक्षण, मुस्लिम समाजवरील अन्याय व अत्याचार अशा विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

या कार्यक्रमात प्रास्ताविक करताना अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी सांगितले कि, अनेक वर्षांपासून पिंपरी चिचंवड शहरातील मुस्लिम बांधवांचे मूलभूत प्रश्न आजतागायत सुटलेले नाहीत. त्यामुळे राजकीय पक्षांवर व नेत्यांवर अवलंबून न राहता आपले प्रश्न सोडवण्यासाठी मुस्लिम समाजातील सर्वपक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन प्रश्नांवर संवाद करावा व ते प्रश्न सोडवण्यासाठी आपला दबाव गट तयार करावा व त्यामध्यमतून मुस्लिम समाजाच्या आर्थिक ,शैक्षणिक ,सामाजिक परिस्थितीत सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्न करावेत.

या विचारमंथन शिबिराचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गुलाम शेख यांनी सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती देत मुस्लिम समाजच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व मुस्लिम नेत्यांना एका व्यासपीठावर आणल्याबद्ल अपना वतन संघटनेचे कौतुक केले. मुस्लिम समाजातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी एक समिती तयार करून सर्व प्रश्नांवर एक कृती आराखडा तयार करावा व त्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नावर रचनात्मक व संघटितपणे काम करून संबंधित यंत्रणासोबत पत्रव्यवहार व पाठपुरावा करावा.

या विचारमंथन शिबिरामध्ये जमियत उलेमाये हिंद चे हाजी गुलजार शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युसूफ कुरेशी, काँग्रेस पक्षाचे शहाबुद्दीन शेख, शिवसेनेचे हाजी दस्तगीर मणियार, भाजपचे फारुख इनामदार, समाजवादी पक्षाचे रफिक कुरेशी, आर पीआय चे अजिजभाई शेख, शाहरुख खान, आझाद समाज पक्षाचे रहीम सय्यद, वेलफेयर पार्टी ऑफ इंडियाचे सालार शेख, सामाजिक कार्यकर्ता फेहमिदा शेख, महा विकास समितीचे फरीद शेख, आझाद ग्रुपचे जमीर शेख, मौलाना अबुल कलाम संस्थेचे हाजी गुलाम रसूल, अखिल रहमानी समाज रौफ शेख, रक्षक संघटनेचे जमील औटी, स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशनचे अब्दुलमाजीद शेख, मुबीन शेख, मदद फाउंडेशन अन्वरअली शेख, शिकलगार समाज संघाचे सलीम शिकलगार, सरकार ग्रुपचे लतीफ सय्यद, रशीद शेख, नईम शेख, ताहीर शेख, जिशान शेख, जलालुद्दीन शेख, जाफर खान, सहजी अत्तार, शाकीर शेख, हाजीमलंग शेख, नासिर शेख, कामरुनिसा शेख, जुनेद जहागीरदार, अमीरहमजा शेख, निजमुद्दीन शेख, ऍड नशीब खान, असलं शेख याकूब शेख, मुस्तफा तांबोळी, अकील शेख, सिमरन कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते .

कार्यक्रमाचे आयोजन अपना वतन संघटनेचे पिंपरी चिचंवड कार्यध्यक्ष हमीद शेख, महिला अध्यक्ष राजश्री शिरवळकर, ऍड फारुख शेख, मलंग शेख, प्रकाश पाठारे, अस्लम शेख, अल्ताफ शेख, राम चिंतले यांनी केले.