Tag: Akola

मातंग समाजासाठी झटणारा तारा निखळला
महाराष्ट्र

मातंग समाजासाठी झटणारा तारा निखळला

मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय लहू शक्तीचे संस्थापक-अध्यक्ष मधुकरराव कांबळे यांचे निधन अकोला, ता. २५ (लोकमराठी न्यूज) : मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय लहू शक्तीचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री मधुकरराव कांबळे (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी (ता. २५ जुलै २०२३) अकोला येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर व समाजावर शोकाकुल पसरली आहे. त्यांच्यावर पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्षही होते. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी (ता. २६ जुलै) एक वाजता उमरी, स्मशानभूमी (रेल्वे लाईन जवळ) Akola येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पुर्वी त्यांचे पार्थिव राज्यातील कार्यकर्त्यांच्या अत्यंदर्शनासाठी अकोला येथील त्यांच...