Tag: Anil Deshmukh

सोशल मिडीया वापरत आहात; तर जरा जपुन | गैरवापर केल्यास होणार कठोर कारवाई
मोठी बातमी, महाराष्ट्र

सोशल मिडीया वापरत आहात; तर जरा जपुन | गैरवापर केल्यास होणार कठोर कारवाई

गृहमंत्री देशमुख यांचा समाजकंटकांना इशारा लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई, ता. 13 (Lokmarathi) : काही विघ्नसंतोषी लोक सोशल मिडीयाचा (समाज माध्यम) दुरुपयोग करून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र सायबर विभाग लक्ष ठेवून आहे. जर असे काही कराल तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समाजकंटकांना दिला आहे. कोरोना साथीमुळे असलेल्या लॉकडाऊन दरम्यान याचे प्रमाण वाढले आहे. अफवा व खोट्या बातम्या पेरुन भीती व द्वेष पसरविण्याच्या या प्रकारांवर महाराष्ट्र सायबर सेलने बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना श्री. देशमुख यांनी सायबर विभागाला दिल्या आहेत. पोलिसांनी अशा लोकांविरुद्ध लॉकडाऊनच्या कालावधीत 176 गुन्हे नोंदविले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये द्वेष...

Actions

Selected media actions