अंनिसचा आगरकर पुरस्कार सुनीलकुमार लवटे यांना, तर जीवनगौरव पुरस्कार प्रभाताई पुरोहित यांना जाहीर!
संतराम कर्हाड (अंबाजोगाई), वसंतराव टेंकाळे (लातूर), विजयाताई श्रीखंडे (नागपूर), विनायक चव्हाण (इचलकरंजी), उदयकुमार कुर्हाडे (येवला) यांचाही विविध पुरस्कारांनी सन्मान
मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने समाजात - चळवळीत भरीव योगदान देणार्या विविध कार्यकर्त्यांना, मान्यवरांना खालील अंनिसचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत. लवकरच एका कार्यक्रमात हे सर्व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जातील.
‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना जाहीर
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दिला जाणारा ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार’ ज्येष्ठ लेखक - विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना जाहीर करण्यात येत आहे. सन्मानपत्र व 15 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. लवटे सर पुरोगामी चळवळींचे मार्...