Tag: B G Kolse Patil

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे पूर्ववत पोलीस संरक्षण द्यावे | अपना वतन संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्र, मोठी बातमी

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे पूर्ववत पोलीस संरक्षण द्यावे | अपना वतन संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना पूर्ववत पोलीस संरक्षण द्यावे. अशी मागणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. याबाबत ईमेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील अत्यंत कष्टातून पुढे आलेलं नाव आहे. त्यांचे आईवडील भूमिहीन शेतकरी होते. त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी स्वतः काम करून शिक्षण पूर्ण करावे लागले. त्यांनी अनेक अडचणींचा सामना करीत आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केले, एलएलबी पदवी मिळवली आणि पुढे फौजदारी कायद्यामध्ये विशेष अभ्यास केला आणि ते वयाच्या ४३ व्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदापर्यंत पोहचले. या पदावर असताना "कांजीलाल प्रेमजीत विरुद्ध क्षेत्रीय वनाधिकारी" खटला असो किंवा "असोसियेटेड बेअरिंग्स विरोधात भारत सरकार" हा खटला असो त्यां...