एस. एम. जोशी महाविद्यालयात ‘बालदिन’ साजरा
हडपसर - १४ नोव्हेंबर; प्रतिनिधी - डॉ. अतुल चौरे : हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम.जोशी महाविद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 'बालदिन' म्हणून सांस्कृतिक विभागामार्फत साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हडपसर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिगंबर शिंदे साहेब उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब म्हणाले, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो. कारण भारताचे पहिले पंडित पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रेमळ स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते देशाचे आदर्श नागरिक होतील. अशा विचाराने पंडि...