Tag: Bhosari.

महावितरण अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी दिघीकर विकास प्रतिष्ठानची गांधीगिरी
पिंपरी चिंचवड

महावितरण अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी दिघीकर विकास प्रतिष्ठानची गांधीगिरी

दिघी : मागील काही दिवसांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव, वाढिव बिले, जळालेले मिटर बसविण्यात होणारी दिरंगाई तसेच तक्रार निवारण केंद्र आदी विषयांवर नाराजी व्यक्त करत दिघीकर विकास प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पध्दतीने निवेदन दिले आहे.. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज कार्यालय उघडले होते. अधिकारी उपस्थित असतील अशा अपेक्षेने दिघीकर विकास प्रतिष्ठानचे प्रतिनिधी मंडळ दिघी रोड, भोसरीतील कार्यालयात पोहोचले. परंतु, सहाय्यक अभियंता श्री. वैरागकर हे रजेवर असल्याचे सांगितले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सदन येथील कार्यालयाशी संपर्क साधला असता तेथील उपकार्यकारी अभियंता श्री. चव्हाण यांना संपर्क साधला असता, आपण चऱ्होली येथे गेल्याचे सांगितले. यानंतर मात्र दि. वि. प्रतिष्ठानच्या मंडळींनी थेट गवळीमाथ्याच्या कार्यालयात जाऊन थेट ...