महावितरण अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी दिघीकर विकास प्रतिष्ठानची गांधीगिरी

महावितरण अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी दिघीकर विकास प्रतिष्ठानची गांधीगिरी

दिघी : मागील काही दिवसांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव, वाढिव बिले, जळालेले मिटर बसविण्यात होणारी दिरंगाई तसेच तक्रार निवारण केंद्र आदी विषयांवर नाराजी व्यक्त करत दिघीकर विकास प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पध्दतीने निवेदन दिले आहे..

दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज कार्यालय उघडले होते. अधिकारी उपस्थित असतील अशा अपेक्षेने दिघीकर विकास प्रतिष्ठानचे प्रतिनिधी मंडळ दिघी रोड, भोसरीतील कार्यालयात पोहोचले. परंतु, सहाय्यक अभियंता श्री. वैरागकर हे रजेवर असल्याचे सांगितले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सदन येथील कार्यालयाशी संपर्क साधला असता तेथील उपकार्यकारी अभियंता श्री. चव्हाण यांना संपर्क साधला असता, आपण चऱ्होली येथे गेल्याचे सांगितले.

यानंतर मात्र दि. वि. प्रतिष्ठानच्या मंडळींनी थेट गवळीमाथ्याच्या कार्यालयात जाऊन थेट कार्यकारी अभियंता श्री. आर के गवारे यांचेशी संपर्क साधला. अण्… त्यांच्यासमोर मोबाईल करून तक्रार निवारण केंद्राची दिघीत गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले.

तसेच विभागातील अंडरग्राऊंडचे काम, वाढीव बिले, विजेचा लपंडाव तसेच ग्राहकांना जळालेल्या मिटरचे पैसे भरून देखील मिटर मिळत नाहीत. हे कागदोपत्री समजावून सांगितले.

त्यानंतर श्री. आर के गवारे यांनी मोबाईल करून पदाधिकारी यांना समज देत, दिघीकर विकास प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना वेळ देत दिघीमध्ये जावून तक्रारी ऐकून घेण्यासाठी सांगितले आहे. असे असले तरीही, महावितरणचे कर्मचारी यांनी ग्राहकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे. तसेच ते प्रामाणिकपणे सोडविले पाहिजेत. असे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले आहे.

तसेच नागरीकांच्या हितासाठी संघर्ष करण्यात अग्रेसर असलेल्या दि. वि. प्रतिष्ठानच्यावतीने गांधीगिरी पध्दतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंत्यांना सामाजिक कार्यकर्ते रवि चव्हाण, युवानेते श्री. कुलदीप परांडे, श्री. संतोष जाधव यांनी समस्या सांगितल्या. तर प्रतिनिधी मंडळामध्ये अध्यक्ष अॅड. उत्तम घुगे आणि श्री. कृष्णत गाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.