Tag: Dighi

दिघीतील दत्त काॅलनीत दत्तजयंती उत्साहात साजरी
सिटिझन जर्नालिस्ट

दिघीतील दत्त काॅलनीत दत्तजयंती उत्साहात साजरी

दिघी : येथील दत्त काॅलनीमध्ये दत्त मंदिरात भजन, किर्तनाचा गजर दत्तजंयती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त दोन दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविक दत्तनामाच्या जयघोषात न्हाऊन निघाले. दर्शनासाठी आलेल्या भक्तांना खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन दिघीचा आदिवासी वाघ संस्थेच्या वतीने करण्यात आले. यावेळी अध्यक्ष वसंत रेंगडे, नगरसेवक विकास डोळस, नगरसेविका निर्मला गायकवाड, माजी नगरसेविका आशा सुपे, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप पंराडे, संजय गायकवाड, ज्ञानेश आल्हाट, सचिन दुबळे, कमलाकर मुंढे, रवि पोहरे, हरीभाऊ लबडे, रमेश विरणक, संजय बांबळे, प्रविण बांबळे बबन पारधी, अॅड कुणाल तापकीर, ज्योती तापकीर, सागर तापकीर, किशोर ववले, महेश झपके, अमोल देवकर, हरीभाऊ लबडे, धनाजी खाडे, प्रतीक शिरसाठ, बाळासाहेब सुपे आदी उपस्थित होते. ...
महावितरण अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी दिघीकर विकास प्रतिष्ठानची गांधीगिरी
पिंपरी चिंचवड

महावितरण अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी दिघीकर विकास प्रतिष्ठानची गांधीगिरी

दिघी : मागील काही दिवसांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव, वाढिव बिले, जळालेले मिटर बसविण्यात होणारी दिरंगाई तसेच तक्रार निवारण केंद्र आदी विषयांवर नाराजी व्यक्त करत दिघीकर विकास प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पध्दतीने निवेदन दिले आहे.. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज कार्यालय उघडले होते. अधिकारी उपस्थित असतील अशा अपेक्षेने दिघीकर विकास प्रतिष्ठानचे प्रतिनिधी मंडळ दिघी रोड, भोसरीतील कार्यालयात पोहोचले. परंतु, सहाय्यक अभियंता श्री. वैरागकर हे रजेवर असल्याचे सांगितले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सदन येथील कार्यालयाशी संपर्क साधला असता तेथील उपकार्यकारी अभियंता श्री. चव्हाण यांना संपर्क साधला असता, आपण चऱ्होली येथे गेल्याचे सांगितले. यानंतर मात्र दि. वि. प्रतिष्ठानच्या मंडळींनी थेट गवळीमाथ्याच्या कार्यालयात जाऊन थेट ...