दिघीतील दत्त काॅलनीत दत्तजयंती उत्साहात साजरी

दिघी : येथील दत्त काॅलनीमध्ये दत्त मंदिरात भजन, किर्तनाचा गजर दत्तजंयती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त दोन दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविक दत्तनामाच्या जयघोषात न्हाऊन निघाले. दर्शनासाठी आलेल्या भक्तांना खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन दिघीचा आदिवासी वाघ संस्थेच्या वतीने करण्यात आले. यावेळी अध्यक्ष वसंत रेंगडे, नगरसेवक विकास डोळस, नगरसेविका निर्मला गायकवाड, माजी नगरसेविका आशा सुपे, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप पंराडे, संजय गायकवाड, ज्ञानेश आल्हाट, सचिन दुबळे, कमलाकर मुंढे, रवि पोहरे, हरीभाऊ लबडे, रमेश विरणक, संजय बांबळे, प्रविण बांबळे बबन पारधी, अॅड कुणाल तापकीर, ज्योती तापकीर, सागर तापकीर, किशोर ववले, महेश झपके, अमोल देवकर, हरीभाऊ लबडे, धनाजी खाडे, प्रतीक शिरसाठ, बाळासाहेब सुपे आदी उपस्थित होते.