Tag: MSEB

सव्वा वर्षांत पिंपरी विभागाने बदलले १८७०० वीज मीटर | महावितरणचा महाघोटाळा ; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग?
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

सव्वा वर्षांत पिंपरी विभागाने बदलले १८७०० वीज मीटर | महावितरणचा महाघोटाळा ; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग?

https://youtu.be/aGgooUJBCu0 रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : वीज बिलात तोडपाणी करत वीज मीटरच गायब करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. सुमारे सव्वा वर्षांच्या काळात महावितरणच्या पिंपरी विभागीय कार्यालयातून १८ हजार ७७० वीज मीटर बदलून दिले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा महावितरणचा महाघोटाळा असून यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता माहिती अधिकार कार्यकर्ते राजेश रोचिरमानी यांनी व्यक्त केली आहे. याबाबत लोकमराठी न्यूजशी बोलताना रोचिरमानी म्हणाले की, कोरोना काळात अंदाजे रिडींगद्वारे आलेल्या अव्वाच्या सव्वा बिलात तोडपाणी करत पिंपरीतील महावितरणचे काही अधिकारी व कर्मचारी वीज मीटर गायब करतात, त्यांचा हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी मी स्वतः बळीचा बकरा झालो. त्यासाठी माझेही जास्त आलेले बिल कमी कर...
महावितरण अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी दिघीकर विकास प्रतिष्ठानची गांधीगिरी
पिंपरी चिंचवड

महावितरण अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी दिघीकर विकास प्रतिष्ठानची गांधीगिरी

दिघी : मागील काही दिवसांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव, वाढिव बिले, जळालेले मिटर बसविण्यात होणारी दिरंगाई तसेच तक्रार निवारण केंद्र आदी विषयांवर नाराजी व्यक्त करत दिघीकर विकास प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पध्दतीने निवेदन दिले आहे.. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज कार्यालय उघडले होते. अधिकारी उपस्थित असतील अशा अपेक्षेने दिघीकर विकास प्रतिष्ठानचे प्रतिनिधी मंडळ दिघी रोड, भोसरीतील कार्यालयात पोहोचले. परंतु, सहाय्यक अभियंता श्री. वैरागकर हे रजेवर असल्याचे सांगितले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सदन येथील कार्यालयाशी संपर्क साधला असता तेथील उपकार्यकारी अभियंता श्री. चव्हाण यांना संपर्क साधला असता, आपण चऱ्होली येथे गेल्याचे सांगितले. यानंतर मात्र दि. वि. प्रतिष्ठानच्या मंडळींनी थेट गवळीमाथ्याच्या कार्यालयात जाऊन थेट ...