Tag: #bjp

PIMPRI : भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा – महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांची मागणी
पिंपरी चिंचवड

PIMPRI : भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा – महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांची मागणी

पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) - कॉंग्रेसच्या प्रचारात सहभागी होणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करण्याची धमकी भाजपचे खासदार धनंजय महाडिक (MP Dhanjay Mahadik) यांनी दिली आहे. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत पिंपरी चिंचवड शहरात महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावेळी माजी नगरसेविका निगार बारस्कर, स्वाती शिंदे, शबाना शेख, आशा भोसले, महाराष्ट्र प्रदेश एन. एस. यु. आय.चे माजी अध्यक्ष मनोज कांबळे, एन. एस. यु. आय.चे उपाध्यक्ष उमेश खंदारे, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, संदेश नवले, आबा खराडे, हिरामण देवकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसवर टीका करताना चक्क महि...