Tag: Borhadewadi

बोऱ्हाडेवाडीतील धोकादायक झाडाची छाटणी करण्याची मागणी
पिंपरी चिंचवड

बोऱ्हाडेवाडीतील धोकादायक झाडाची छाटणी करण्याची मागणी

पिंपरी चिंचवड (बाळासाहेब मुळे) : बोऱ्हाडेवाडी-विनायक नगर येथील कॉलनी क्रमांक एकमध्ये एक कडुलिंबाचे झाड रस्त्यावरती झुकले आहे. त्यामुळे ते कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून या झाडाची छाटणी करावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांकडून या झाडाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना कळवले. पण याकडे कानाडोळा केला जात आहे. महापालिकेकडेही तक्रार दिलेली आहे. जवळच मराठी माध्यमाची महापालिकेची व एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा असते. हे झाडं रस्त्यावरती झुकलेले असल्याने जोरदार वाऱ्यामध्ये ते पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर महापालिका उद्यान विभागाने झाडाच्या छाटण्याची व्यवस्था करावी, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे....

Actions

Selected media actions