वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या प्रवाशाकडुन खंडणी उकळणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
पुणे, दि.२ (लोकमराठी) - वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या प्रवाशाकडुन खंडणी उकाळणा-या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; फिर्यादी वय वर्षे ४१ यांना रिक्षामधील चार अनोळखी आरोपींनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देवुन त्यांच्या पत्नीकडून ऑनलाईन २५,०००/- रु मागुन खंडणी उकळल्या प्रकरणी रिक्षामधील चार अनोळखी आरोपीविरोद्ध बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. ४०/२०२६ न्याय संहिता कलम ३०८ (५).३ (५) अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयाने सर्व आरोपींना दिनांक ०२/०३/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दाखल गुन्हयाचे तपासामध्ये आरोपींकडून गुन्हा करतेवेळी वापरलेली रिक्षा व गुन्ह्यातील खंडणी स्वरूपात घेतले रक्कमेपैकी १०,०००/- रुपये जप्त करण्यात आलेले आहेत. दाखल गुन्हयाचा अधिक तपास चालू आहे.
गणेश आण्णा जगधने वय २९ वर्ष रा. अमयाजॉट कॅनॉल, गुलटेकडी मुण...










